गडचांदूर येथील भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांचे कोरोना मुळे निधन #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर येथील भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांचे कोरोना मुळे निधन #covid-19

Share This
खबरकट्टा चंद्रपूर /गडचांदुर शहर प्रतिनिधी - 


गडचांदूर येथील भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष व किराणा व्यापारी श्री. सुनील चिंतलवार, वय 57 यांचे आज पहाटे नागपूर येथे कोरोना मुळे निधन झाले. 

पाच दिवसापूर्वी सुनील चिंतलवार यांना ताप व खोकला झाला होता. त्यांनी गडचांदूर येथे उपचार केले, ताप कमी झाला. पण नंतर त्यांची तब्बेत अचानक बिघडली आणि कोरोना टेस्ट पॉजिटिव आली.


त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे बेड न मिळाल्याने व प्रकृती ढासळत असल्याने नागपुरला नेण्यात आले. परंतु त्यांना ऑक्सिजन मिळाले नाही, अखेर आज पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज संपली.


मूल येथील शिव किराणाचे मालक,व्यापारी राजेश चिंतलवार यांचे ते जेष्ठ बंधू होते.