खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -
बल्लारपूर येथे 26 वर्षीय मतिमंद युवकावर बळजबरी करत त्याला शारीरिक इजा केल्याची घटना समोर आली आहे. मुख्य म्हणजे या घटनेतील आरोपी कोरोना पॉसिटीव्ह निघाल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली.
सविस्तर माहिती नुसार टेकडी परिसरातील पंडित दीनदयाल वार्डातील गौशाळेत काम करणाऱ्या एका ( वय -26 वर्ष )मूकबधिर युवकावर परिसरातील ओळखीच्या व्यक्तीने 1 सप्टेंबरच्या रात्री बळजबरीने त्याचे कपडे काढून अनैसर्गिक कृत्य केले.त्यात त्या मतिमंद युवकाला शारीरिक इजा सुद्धा झाल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मतिमंद युवकाने सदर घटना हातवारे करीत गौशाळा मालकाला सांगितली. त्यानंतर तात्काळ मालकांनी पीडित युवकाने सांगितलेल्या वर्णनावरून बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला.
पीडित युवकाने आरोपीला ओळ्खल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली.बल्लारपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या प्रभावानुसार कोर्टात हजर करण्यापूर्वी त्या आरोपीची अँटिजेन चाचणी करण्यात आली.या चाचणीत हा आरोपी पॉसिटीव्ह असल्याचे कळतच एकच खळबळ उडाली.
पॉसिटीव्ह निघालेल्या या आरोपीला जमातीवर सोडून इन्स्टिट्यूशनल विलगीकरणात ठेवण्यात आले आहे व आरोपीच्या संपर्कात आलेले पोलीस कर्मचारी गृह विलगीकरणात असल्याचे कळते.