🛑गडचांदूर पोलीस प्रशासनाचा न्यायालयाच्या आदेशाला खो ⭕ न्यायालयाचा आदेश असून देखील ईशान शेख याचा मोबाईल देण्यास दिला नकार ⚫ दोन महिन्यापूर्वी आंदोलन होण्याआधीच सुरज ठाकरे व सहकाऱ्यांना अटक केलेल्या प्रकरणांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका वैयक्तिक की राजकीय? 🔴 प्रकरण गडचांदूर पोलीस निरीक्षकांच्या अंगलटी येणार की काय ? #court order dishonoured - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

🛑गडचांदूर पोलीस प्रशासनाचा न्यायालयाच्या आदेशाला खो ⭕ न्यायालयाचा आदेश असून देखील ईशान शेख याचा मोबाईल देण्यास दिला नकार ⚫ दोन महिन्यापूर्वी आंदोलन होण्याआधीच सुरज ठाकरे व सहकाऱ्यांना अटक केलेल्या प्रकरणांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका वैयक्तिक की राजकीय? 🔴 प्रकरण गडचांदूर पोलीस निरीक्षकांच्या अंगलटी येणार की काय ? #court order dishonoured

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


दोन महिन्यापूर्वी सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथील कामगारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एक दिवसीय बंद प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर यांच्याकडून पुकारण्यात आला होता. 

त्यावेळी कंपनी प्रशासनाला निवेदन देण्याकरिता सुरज ठाकरे त्यांच्यासोबत राहुल चव्हाण, निखिल बजाईत, ईशान शेख अज्वान टाक, नितीन कुमरे इत्यादी सहकारी कंपनीच्या दिशेने जात असताना गडचांदूर येथील शेडमाके चौक येथे सुरज ठाकरेंची फॉर्च्युनर क्रमांक 40 डीजे 5052 ही गडचांदूर पोलिसांनी नाकाबंदी कडून अडवली व त्यांना त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक गडचांदूर यांनी ताब्यात घेऊन तत्कालीन एस.डी.पी. ओ. राजुरा श्री स्वप्नील जाधव यांच्या स्वाधीन केले.


यांच्यासह इतर सहकार्‍यांना राजुरा पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले त्याठिकाणी जवळपास दिवसभर चौकशी च्या नावावर त्यांना थांबवून ठेवण्यात आले या ठिकाणी उल्लेखनीय म्हणजे सुरज ठाकरे यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांना स्वतःच्या दालनामध्ये बोलावून जाणीवपूर्वक सूरज ठाकरे यांना डीवचण्याकरता मारहाण केली व व सुरज ठाकरे यांच्या हातून रागाच्या भरात कुठलेतरी कृत्य व्हावे याकरता त्यांना बऱ्याच वेळा चिथावले.
 

परंतु त्या वेळी त्यांनी संयम बाळगला व स्वप्नील जाधव यांच्या विरोधामध्ये थेट गृहमंत्री आणि देशमुख यांच्याकडे एकदा नव्हे तर दोनदा तक्रार दिली आहे व त्या प्रकरणी चौकशी देखील लागलेली आहे. अशी माहिती मिळाली आहे. 


या सर्व गोष्टींचा द्वेष पकडून पोलीस प्रशासन या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झालेल्या पैकी ईशान शेख यांचा मोबाइल जप्त केलेला असल्याने त्यांनी कोरपना न्यायालयामध्ये मोबाईल सोडवण्याकरता सुपुर्द नामा द्वारे अर्ज केला. 


त्या सुपूर्द नाम्याला गडचांदूर पोलीस यांनी प्रखर विरोध केला असता देखील न्यायालयाने ईशान शेख यांचा मोबाईल परत करण्याचे आदेश गडचांदूर पोलिसांना दिले. त्या आदेशाची प्रत घेऊन आपला मोबाईल घेण्याकरता ईशान शेख आज गडचांदूर पोलीस स्टेशनला गेले असता त्यांचा मोबाईल हा नागपूर येथे फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठविला आहे .असे उत्तर त्यांना गडचांदूर पोलीस चे या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर. आर. चौधरी यांनी दिले.


ही बाब अत्यंत आश्चर्यकारक असून सदर प्रकरणांमध्ये काहीही नसतानादेखील अशा पद्धतीचे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन पोलीस प्रशासन नेमके कुणाच्या सांगण्यावरून करीत आहे ही बाब महत्त्वपूर्ण आहे एकंदरच या सर्व प्रकरणांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खाजगी मर्जी राखण्याकरिता पोलीस प्रशासन हे कोर्टाच्या आदेशाला देखील जुमानत नसल्याने एकंदरच आता हे प्रकरण कोर्टासमोर गेल्यानंतर गडचांदूर पोलीस निरीक्षक हे कोर्टाला कसे सामोरे जाणार ही बाब सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.


या विषयांमध्ये सुरज ठाकरे हे माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याबाबत बातमी मिळाली आहे सुरज ठाकरे व एसडीपीओ स्वप्नील जाधव यांच्यामधील या शित युद्धा मध्ये गडचांदूर पोलीस निरीक्षकाचा बळी तर जाणार नाही ना अशी चर्चा सर्वत्र रंगलेली आहे.