खबरकट्टा/चंद्रपूर /चिमूर:
कामगारांचे न्याय ह्क्क मालकांच्या ,उद्योगपतीच्या,व कंपनीच्या हातात देऊन कामगार विरोधी श्रम संहिता विधेयक कायदा संसदे मध्ये पारीत करण्यात आला आहे.यापारीत कामगार विरोधी कायद्याचा निषेध करून या कायद्याला रद्दबादल करण्याची मागणी स्वराज्य कामगार संघटनेने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
केंद्र शासन कामगांराच्या हक्क,संविधानीक अधिकार व स्वांतत्र्य हिरावुन भांडवलशाहीच्यां हित संरक्षण करणारे धोरण अवलंबीले आहे.याचाच एक भाग म्हणुन संसदेमध्ये श्रमसंहिता विधेयक पारीत केला.या कायद्याचा स्वराज्य कामगार संघटनेतर्फे काळे मॉस्क लावुन जाहीर निषेध करण्यात आले.
हा काळा कायदा रद्दबादल करूण देशातील तमाम कामगारांना न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना देण्यात आले.
निवेदन देताना स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष धनराज गेडाम, सचिव देवचंद टेंभूरकर, कोषाध्यक्ष शारदा गेडाम, प्रसिद्धि प्रमूख जितेंद्र सहारे,जिल्हा संघटक ताजुल मेश्राम,शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,श्रीहरी सातपुते,सुरेंद्र ढोकणे,निलेश सरकटे,प्रदिप मेश्राम, प्रफुल मेश्राम,हरीदास मडावी,मनोज राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.