पोलीस स्टेशन चिमूर येथे दि. १८ / ९/२०२० रोजी फिर्यादी अंकिता दीपक नैताम वय २१ वर्ष रा. कवडसी हिचे फिर्याद वरून तिचे पती दिपक वय ३२ वर्ष रा .बामणी ता .उमरेड हे कवडसी जंगलातील बोडीतील पाण्यात बुडून मरण पावल्याने मर्ग नोंद करण्यात आला.
पोलीस विभाग चिमुर कडुन तपास करण्यात आला असता मृतक याला त्याचा साळा हा बहिणीला त्रास देतो असे बोलुन जिवाने मारण्याची धमकी देत असल्याने मृतकाचा साळा रोशन सूर्यभान मसराम वय ३० वर्ष यास कसून विचारपूस केली.
त्यात तपासात मृतक याचासोबत घटनेदिवशी झगडा भांडण करून मृतक यास कवडसी शेतशिवारातील पाण्याचे बोडित धक्का देऊन जिवाने ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने फिर्यादी सुनंदा विजय नैताम ता. बोथली ता. उमरेड यांचे तक्रार वरून कलम ३०२ भादविचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब, अप्पर पो. अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे , पोनी स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे मार्गदर्शनात सपोनि मंगेश मोहोड हे पथकातील कर्मचारी पोशी प्रमोद गुट्टे,सचिन गजभिये, सतीश झिलपे यांचेसह करीत आहे.
याच आठवड्यात मूल तालुल्यातील केळझर येथे अश्याच पद्धतीच्या - पाण्यात बुडून मेल्याचा आव आणल्यानंतर पोलीस चौकशीत मारून पाण्यात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली होती.