शेणखताच्या खड्यामुळं नागरिकांच्या आरोग्यास धोका : नेरी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, गांधी वार्डातील नागरिकांची मागणी #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेणखताच्या खड्यामुळं नागरिकांच्या आरोग्यास धोका : नेरी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, गांधी वार्डातील नागरिकांची मागणी #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर - नेरी प्रतीनीधी -


सद्या कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव असून, पावसाळ्याचे सुद्धा दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसात व कोरोनाच्या प्रादुर्भावात संसर्गजन्य आजार झपाट्याने प्रसारित होतो आहे. 


यातच नेरी येथील गांधी वार्डात डाकेश्वर पिसे व आनंदराव पिसे यांनी आपल्या स्वाताच्या घराच्या अंगणात खताचा खड्डा खोदून शेणखत टाकत आहे. यामुळं घराजवळील गांधी वार्डातील नागरिकांना या खताच्या खड्यामुळे गांधी वार्डातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या खताच्या खड्यात शेणखत असून, पावसाळ्यात खाद्यामध्ये पाणी साचून रोडवर पूर्णपणे वाहत असते. याकडे नेरी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आठ दिवसात खताचा खड्डा बुजवण्यात यावा. अन्यथा या खड्यामुळं वार्डातील एखाद्या व्यक्तीचा संसर्ग आजाराने मृत्यू झाल्यास ग्रामपंचायत प्रशासन याला जवाबदार राहील. असे ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात तक्रार केली आहे.ग्रामपंचायत प्रशासनाला मागील वर्षी पासून अनेकदा खत उचलण्याबाबद व खड्डा बुजवण्याबाबद तक्रार निवेदन देण्यात आले आहे. कोरोना महामारीत एखाद्या व्यक्तीला संसर्ग आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी रामचंद्र कामडी यांनी प्रसिद्द्धीस दिलेल्या पत्रकातुन केली आहे.