श्रद्धांजली : पडोली पंचायत समिती सदस्य प्रेमज्योत चिवंडे यांचे निधन #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्रद्धांजली : पडोली पंचायत समिती सदस्य प्रेमज्योत चिवंडे यांचे निधन #chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे पडोली पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य प्रेमज्योत विश्वनाथ चिवंडे (वय -34) यांचे आज सकाळी अचानक निधन झाल्याने चंद्रपूरातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


दाताला निवासी प्रेमज्योत चिवंडे यांना मागील आठवड्यापासून कोरोना साधर्म्य लक्षणें दिसू लागल्यानंर प्रथमोपचार घेत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली. दोन्ही तपासण्यांमध्ये अहवाल नेगेटिव्ह आला. 


परंतु काल अचानक त्रास जाणवू लागल्याने चंद्रपुरातील कोतपल्लीवार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी न्यूमोनिया चे निदान केल्यानंतर उपचार सुरु असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा आप्तपरिवार आहे.