ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कर्मचारी चंद्रपूर यांनी केले काळे मास्क लाऊन निषेध #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कर्मचारी चंद्रपूर यांनी केले काळे मास्क लाऊन निषेध #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : अमृत दडवंते चंद्रपूर


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी/ कर्मचारीना पुननिर्युक्ती न देता त्यांचे कार्यभार हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले. राज्यात सन 2011 पासून हे अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब परितक्ता, विधवा, एकल, अपंग व मागासवर्गीय महिलांचे समूहाची बांधणी करून समूहातील सदस्यांना बँक कर्ज उपलब्ध करून दिला जातो. तसेच विविध शासकीय योजना ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहचविण्याचे काम कर्मचारी करीत आहे. त्यांना रोजगार व उत्पन्नाचे साधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जातो. समूहातील व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सक्षम बनविले जाते. 

अभियानाचे दि. १० सप्टेंबर २०२० ला पत्र पाठवून १० सप्टेंबर २०२० किंवा त्यानंतर ज्या कर्मचाऱ्याचे करार संपूष्टात आले आहे किंवा येणार आहे अशा कर्मचाऱ्याना पूर्णनियुक्ती न देण्याचे आदेश दिले आहे या आदेशामुळे राज्यातील सुमारे ४००० कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात येणार आहे. व त्यांच्या कुटंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 

कोरोनाच्या काळात आर्थिक तुटवड्याचे कारण दाखवून कंत्राटी कर्मचाऱ्याना कमी करण्याचे षडयंत्र सुरु केले आहे. याच कर्मचाऱ्यानी ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून समूह, ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले परंतु सदर कर्मचाऱ्यांचे उपजीविकेचे काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. 
दि. १० सप्टेंबर २०२० शासन परिपत्रक मागे घ्यावे व दिनांक २९ सप्टेंबर २०२० पासून जिल्हास्तरीय बेमुदत असहकार आंदोलन सुरु केले आहे. येणाऱ्या काळात हे शासन परिपत्रक मागे न घेतल्यास कर्मचारी व ग्रामस्तरीय समुदाय कॅडेर यांचे वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आहे. यासाठी काळे मास्क लाऊन जिल्हा परिषद, चंद्रपूर आवारात निषेध केला.