स्व.शांतारामजी पोटदुखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन : भंगाराम तळोधी येथील ज्ञानशाळेचा उपक्रम #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्व.शांतारामजी पोटदुखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन : भंगाराम तळोधी येथील ज्ञानशाळेचा उपक्रम #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर भूषण स्व. शांतारामजी पोटदुखे ,माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ , चंद्रपूर.यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त भंगाराम तळोधी येथील ज्ञानशाळेत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. 
या निबंध स्पर्धेत एकूण तीस विद्यार्थ्यांनी सहभागी झाले त्यात पारस नीमगडे, प्रांजली फुलझेले, सागर बारसागडे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला.उद्घाटन कार्यक्रम फेसबुक लाईव्ह घेण्यात आला . महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांनी फेसबुक लाईव्ह पेज वर कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये विनम्र आदरांजली कार्यक्रम आयोजित करून जिवती येथे भव्य रक्तदान शिबीर , वृक्षरोपण कार्यक्रम व भंगाराम तळोधी येथील ज्ञानशाळेत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. 
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे , उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष गिरडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या कार्याचा उजाळा मान्यवरांनी दिला. विनम्र आदरांजली देऊन अभिवादन केले. त्याच प्रमाणे स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या कार्याविषयी ,त्यांच्या प्रत्यक्षात मुलाखती त्यांच्या यूट्यूब चैनल वरील लिंक पाठविण्यात आल्या. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी विपुल डोंगरे व अंतिम वर्षाचा विद्यार्थी अनिकेत दुर्गे यांनी परिश्रम घेतले.