चंद्रपूर ब्रेकिंग : तलवारीने प्राणघातक हल्ला, एका आरोपीला अटक तर दुसरा फरार : दारू विक्रेता पिंटू वाढई व प्रदीप वाढई मुख्य हमलावर : पोलिसांचा मुखबीर असल्याचा युवकावर संशय #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : तलवारीने प्राणघातक हल्ला, एका आरोपीला अटक तर दुसरा फरार : दारू विक्रेता पिंटू वाढई व प्रदीप वाढई मुख्य हमलावर : पोलिसांचा मुखबीर असल्याचा युवकावर संशय #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या हप्तेखोरी धोरणामुळे जणू आता सरक्षण मिळायला लागले आहे. 


अशाच इंदिरा नगर येथील पिंटू व प्रदीप वाढई या अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चक्क तलवारीने महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना काल रात्री ९.०० च्या दरम्यान इंदिरा नगर येथे घडली. 


या हल्ल्यात रोहित तूराणकर यांच्या आई ला सुद्धा दुखापत झाली असून जर वेळीच त्या ठिकाणी लोक धावून गेले नसते तर आरोपीने जीवच घेतला असता अशी चर्चा आहे. आरोपी हल्ला करुन पसार झाल्यानंतर काही तासातच एका आरोपीला पकडले तर दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हाके यांच्या नेत्रुत्वात सुरू असून दुसऱ्या आरोपीला लवकरच पकडून पी सी आर घेण्यात येईल असे पोलिस सूत्रांकडून कळते.