पानठेले बंद; मात्र बाजुलाच मिळतो खर्रा :गल्लीबोळात सर्रास विक्री : कोरोना नियमांचे उल्लंघन #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पानठेले बंद; मात्र बाजुलाच मिळतो खर्रा :गल्लीबोळात सर्रास विक्री : कोरोना नियमांचे उल्लंघन #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोनाबाधित व्यक्तीच्या थुंकीवाटे कोरोना पसरतो. परिणामी जिल्ह्यात कुठेही पानटपऱ्या उघडण्यास अद्याप जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे चंद्रपुरातील पानटपऱ्या बंद आहेत. मात्र खºर्याची विक्री नियमित सुरू आहे. बंद पानटपऱ्याच्या बाजुलाच सर्रास खर्रा विक्री केली जाते.चंद्रपूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये --कोरोनाचे रूग उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करीत आहे. कोरोनाबाधित रूग्णाच्या थुंकी अथवा नाका-तोंडावाटे बाहेर पडणारा सूक्ष्म द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरात गेल्यास कोरोनाची लागण होते.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पानटपऱ्या उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. असे असले तरी पानटपरी व्यावसायिकांनी अनधिकृतपणे खर्रा विकणे सुरू ठेवले आहे. महापालिकेसह संबंधित विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. याचाच गैरफायदा घेत पानटपरी व्यावसायिकांनी आपला व्यवसाय आणखी तेजीत आणला आहे.


शहरातील सर्वच कॉलनी आणि रस्त्यावर व शहरातील गल्लीबोळात खर्रा सहज उपलब्ध होत असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, मिलन चौक, भानापेठ, जटपुरा गेट परिसर, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक, जनता कॉलेज चौक, नगिनाबाग, घुटकाळा वार्ड, बाबुपेठ, जगन्नाथ बाबा नगर, सिस्टर कॉलनी यासह शहरातील जवळजवळ सर्वच भागात चालता-फिरता खऱ्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाला याची माहिती नाही, हे शक्य नाही. तरीही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.🔴 सुगंधित तंबाखू मुबलक

शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व उत्पादनावर बंदी घातली आहे. तरीही सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरू होती. आता कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सुगंधित तंबाखूपासून बनणाऱ्या खºर्यावरही बंदी आली आहे. तरीही खर्रा तयार करण्यासाठी पानटपरी चालकांकडे सर्रास सुगंधित तंबाखू उपलब्ध होत आहे.