सिडीसीसी बँक मेंडकी शाखेतील फसवणूक प्रकरणी ३ आरोपीना अटक - आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई #cdcc-bank-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिडीसीसी बँक मेंडकी शाखेतील फसवणूक प्रकरणी ३ आरोपीना अटक - आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई #cdcc-bank-chandrapur

Share This
खबरकट्टा : प्रतिनिधी / चंद्रपूर : पदाचा दुरुपयोग करून मयत खातेदाराच्या खात्यावर असलेली रोख रक्कम तसेच शासनाकडून आलेला निधी दुसऱ्याच्या खात्यावर वळता करून फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर च्या मेंडकी शाखेतील तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.रवींद्र अंबादास भोयर (५५) रा. नागभीड, अमित महादेव राऊत (३६) रा. ब्रम्हपुरी व कल्पना रामकृष्ण मसराम (३५) रा. ब्रम्हपुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणात २० जुलै रोजी सहकारी संस्था चंद्रपूर येथील लेखा परीक्षक साजन किसन साखरे यांनी तक्रार दाखल केली होती. यावरून मेंडकी शाखेचे शाखाधिकारी अमित प्रभाकर नागपुरे, लिपिक संजय बाबुराव शेंडे यांच्याविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५,४६८,४७१,४०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.चौकशीअंती १ लाख ३० हजार रुपये आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे , अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्र. के.मकेश्वर, सहाय्यक फौजदार चांदेकर यांनी केली आहे.