CDCC बँकेचे संचालक मंडळ कोरोनाच्या विळख्यात : एका संचालकाचा मृत्यू : 7-8 संचालक व कुटुंबीय कोरोना बाधित : संतोष रावत अध्यक्षनिवड होताच आढळले होते बाधित #cdcc-bank-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

CDCC बँकेचे संचालक मंडळ कोरोनाच्या विळख्यात : एका संचालकाचा मृत्यू : 7-8 संचालक व कुटुंबीय कोरोना बाधित : संतोष रावत अध्यक्षनिवड होताच आढळले होते बाधित #cdcc-bank-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एरव्ही नानाविध कारणाने जिल्ह्यात सतत चर्चेचा विषय आहे. माजी अध्यक्ष मनोहर पाउणकर यांनी फौंजदारी प्रकरणानंतर राजीनामा दिल्यावर बँकेच्या संचालक मंडळातून नवे अध्यक्ष म्हणून संतोषसिंग रावत यांचीं बहुमताने नियुक्ती करण्यात आली. परंतु, बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याझाल्याच रावत हे कोरोना बाधित (पॉसिटीव्ह ) निघाले व खळबळ उडाली. सध्या रावत नागपूर येथे उपचार घेत असून त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बाधित झाल्याची माहिती येत आहे. या अध्यक्ष निवडणूक पूर्व, नव्या अध्यक्षपदाच्या दावेदारी साठी त्यांनी बरीच धावपळ करत नागपूर येथे बँकेच्या 12 संचालकांना सहलीला नेले होते. या सहली दरम्यान एकमेकांच्या संपर्कात आल्याने आता अध्यक्ष समेत इतरही 7 ते 8 संचालक कोरोना बाधित झाल्याचे समजते. या बाधित संचालकांत शेखर धोटे, अनिल खनके, पांडुरंग जाधव, संदीप गड्डमवार, रवींद्र शिंदे, विजय बावणे, पांडुरंग जाधव, प्रकाश बन्सोड सहित इतर संचालक पॉसिटीव्ह निघाले असून यापैकी काहीजण खाजगी दवाखान्यामध्ये तर काही घरीच विलगीकरणात ट्रीटमेंट घेत आहेत. वरील नमुद संचालकांपैकी शेखर धोटे यांचीं रिकव्हरी झाली असून चंद्रपुरातील माजी नगरसेवक व बँकेचे विद्यमान संचालक अनिल खनके यांचे गेल्या अधवड्याभरापासून उपचार सुरु असताना काल रात्री मृत्यू झाल्याने, संचालक मंडळात भीतीचे वातावरण आहे.