अखेर!त्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला डोंगेघाटावर शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू प्रकरण #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर!त्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला डोंगेघाटावर शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू प्रकरण #bramhpuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी:-


ब्रम्हपुरी शहराला लागूनच असलेल्या प्रसिद्ध अशा डोंगेघाटावर दि 26 सप्टेंबर शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास डोंगेघाटावर पोहण्यासाठी गेलेल्या राजकुमार कवळू सहारे (17) या शाळकरी विद्यार्थ्याचा डोंगेघाटावरील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला होता शनिवारी रात्री उशिरापर्यंत सदर मुलाचा खोल पाण्यात शोध घेतला असता अजिबात थांगपत्ता लागला नव्हता.परत रविवारी सकाळपासूनच शोध मोहीम राबविण्यात आली दरम्यान खोल पाण्यात त्याचा शोध घेतला असता तब्बल 16 तासांनी त्याचा मृतदेह 8 वाजेदरम्यान आढळून आला.मृतक विद्यार्थी मुलगा हा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी असल्याने शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह स्वगावी देऊळगाव येथे नेऊन त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतक मुलगा सुमारे पाच-सहा दिवसांपूर्वीच देऊळगाव येथून ब्रम्हपूरी येथील आजी मालताबाई श्रावण नेवारे यांचेकडे आला होता. दि.२६ शनिवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान प्रसिद्ध डोंगेघाट येथे ब्रम्हपूरी येथील तीन मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. 
दरम्यान खोल पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला .उशिरा सायंकाळपर्यंत डोंगेघाटावर नेहमी पोहणाऱ्या व्यक्तीकडून, मच्छिमारांकडून त्याचा डोंगेघाटावरील खोल पाण्यात शोध घेतला असता उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता मात्र रविवारी सकाळी परत शोधमोहीम राबविण्यात आली आणि खोल पाण्यात त्याचा शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेह सापडला.


पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस .आय. राजेश उंदिरवाडे करीत आहेत.