ब्रम्हपुरी शहरातील काही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरचं गायब :- अतिआवश्यक रुग्णांना अडचणींचा सामना.... :- काही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरचं अनुपस्थित..... :- रुग्णांना वेळेवर उपचार देण्यास खाजगी वैद्यकीय सेवा असमर्थ...#bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी शहरातील काही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरचं गायब :- अतिआवश्यक रुग्णांना अडचणींचा सामना.... :- काही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरचं अनुपस्थित..... :- रुग्णांना वेळेवर उपचार देण्यास खाजगी वैद्यकीय सेवा असमर्थ...#bramhpuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -
Add caption


ब्रम्हपुरी शहर हे चंन्द्रपुर जिल्ह्यातील आरोग्य नगरी म्हणून ओळख आहे.पण सध्या कोरोनाचा पार्दुभाव वाढतच असल्याने ब्रम्हपुरी शहरातील वैद्यकीय सेवा असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका रुग्णांना बसत असुन रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना वेदना सहन कराव्या लागत आहेत.सविस्तर माहिती काल रात्री कुर्झा येथील महिलेला ह्रदयात दुखापत सुरू असताना त्यांना ब्रम्हपुरी शहरातील नामांकित हृदय सर्जन डॉक्टरांच्या कडे नेण्यात आले.पण या हदय रोगांचे निदान करणारे डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांना अनेक वेदनांचा सामाना करावा लागला.ब्रम्हपुरी शहरातील हदय रोगांचे एम.डी . डॉक्टर यांनी रात्रीच्या सुमारास ओ.पी.डी सेवा बंद केल्याने अनेक रुग्णांना वेळेवर उपचार देण्यास खाजगी रुग्णालयातील डॉक्टर असमर्थ असल्याचे चित्र दिसून येत आहे.काल हा प्रकार ब्रम्हपुरी नगरपरिषदचे बांधकाम सभापती तथा गटनेते विलास विखार यांच्या नजरे समोर घडल्याने या घटनेची माहिती आहे.त्यानी स्वंता काल रात्री सुमारास या महिलेला ह्रदयात दुखापत असल्याने उपचारासाठी काही एम.डी.तंज्ञाकडे नेण्यात आले.पण येथील डॉक्टर सेवा देण्यासाठी असमर्थ असल्याचे दिसून येत आहे.रात्रीच्या सुमारास अतीआवश्यक रूग्णाला ओ.पी.डी सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी नगरसेवक विलास विखार यांनी केली.