केंद्रीय पथकाने अंधारात केली पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, ग्रामस्थ झाले नाराज #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

केंद्रीय पथकाने अंधारात केली पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, ग्रामस्थ झाले नाराज #bramhpuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -


30 ऑगस्टपासून 4 सप्टेंबरपर्यंत वैनगंगा नदीच्या महापुराने उध्वस्त झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या पूरग्रस्त भागांचा आज केंद्रीय पथकाने पाहणी दौरा केला. गेले काही दिवस केंद्रीय पथकाच्या या पाहणी दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू होती. 
दरम्यान पूरग्रस्त भागातील विविध गावांना हे पथक भेटी देत मोठे नुकसान झालेल्या गावातील शेती- घरे -जनावरे यांची पाहणी करेल, अशी ग्रामस्थांना आशा होती. मात्र हे पथक मुळातच संध्याकाळी पाच वाजता तालुक्यातील गांगलवाडी या गावात पोचले. पुढिल किन्ही गावात पोहचेपर्यंत चक्क अंधार पडला होता. त्यामुळे ग्रामस्थ नाराज झाले होते.
गावातील शेतशिवारात महापुराने केलेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी पथकातील तीन अधिकाऱ्यांनी केली. इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष त्या दिवशी काय घडले, याशिवाय कुठली पिके घेतली जातात व त्याचा खर्च व इतर गोष्टी पथकाने समजून घेतल्या. 
दरम्यान लगतच्या किन्ही या गावात पथक पोचेपर्यंत अंधार पडला होता. या अंधारातच किन्ही गावातील घरांची पडझड व जनावरांच्या गोठ्याच्या नुकसानीची पाहणी पथकाने केली. यावेळी ग्रामस्थांनी त्या दिवसाचे भयानक चित्र पथकापुढे उभे केले. या संपूर्ण परिसरात महापुराने केलेल्या नुकसानीचा अंदाज केंद्रीय पथकाला आला. 
केंद्रीय पथकाच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या दोन गावातील महापुराने नुकसान केलेल्या शेतीची पाहणी करून हे पथक गडचिरोलीला रवाना झाले. मात्र या पथकाने नक्की काय बघितले, त्यातून या पुराची भयावय स्थितीतिचा अंधारात किती अंदाज आला असेल प्रश्नचिन्ह आहे.