ब्रह्मपुरी पशुधन वैद्यकीय दवाखाना प्रभारी भरोसे, सर्व पदे रिक्त :- पशुपालकांना अडचणींचा सामना :- प्रभारी साभाळतोय सर्व विभाग :- अनेक वर्षांपासून महत्त्वाचे पदें रिक्त :- तालुका पशुधन वैद्यकीय दवाखान्या खाली अठरा गावांचा प्रभार #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरी पशुधन वैद्यकीय दवाखाना प्रभारी भरोसे, सर्व पदे रिक्त :- पशुपालकांना अडचणींचा सामना :- प्रभारी साभाळतोय सर्व विभाग :- अनेक वर्षांपासून महत्त्वाचे पदें रिक्त :- तालुका पशुधन वैद्यकीय दवाखान्या खाली अठरा गावांचा प्रभार #bramhpuri

Share This
खबरकट्टा / ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी येथे सुसज्ज असा मोठा तालुका लघु पशु वैद्यकीय सर्वोच्च चिकित्साकालय असुन मात्र येथे अधिकारी अभाव असल्यामुळे पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथे पशुधन विभागांत पाच अधिकारी पदें आहेत मात्र येथील पांच अधिकारी पदें रिक्त आहेत.


दोन वर्षे आगोदर गट (अ) साहाय्य आयुक्त पशुसंवर्धन-१ निवृत्त झाले आहेत त्यांचा प्रभार साहाय्य पशृधन विकास अधिकारी डॉ.मनिष लाडे यांच्या कडे सोपविण्यात आले आहे.


त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक हे पद एक वर्ष पासून रिक्त आहे.वरिष्ठ लीपिक व परिचर पद तीन वर्षे पासून रिक्त आहेत.त्यामुळे अनेक काळ सर्व कामे साहाय्य पशृधन विकास अधिकारी डॉ.मनिष लाडे यांच्या कडे प्रभार आले. त्यामुळे ब्रह्मपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. कारण १ एप्रिल २०२० ला पशुधन विकास अधिकारी डॉ.मनिष लाडे यांची बदली अर्हेरनवरगाव येथे करण्यात आली.

तसेच अर्हेरनवरगाव येथील पदभार सुध्दा स्वीकारला पण तालुका पशु वैद्यकीय दवाखान्यात सर्व प्रकारचे पदें रिक्त असल्याने येथील प्रभार कोणाकडे सोपविण्यात आले नाही.व अतीरिक्त प्रभार डॉ.मनिष लाडे यांच्या कडे सोपविण्यात आले. सध्या तरी पशुधन विकास अधिकारी सर्व पदांचा प्रभार सांभाळत आहेत. सध्या लम्पी रोगांनी थैमान घातले आहे.


अनेक गावात शिबिर आयोजित करण्यात येत आहेत.पण असा प्रश्न पडतो आहे की आता कोणत्या पशुधन वैद्यकीय दवाखान्यात किती वेळ व पशुपालकांना न्याय देतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.ब्रम्हपुरी शहरात तालुका लघु पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सुसज्ज इमारती साठी १ करोड २४ लाख रुपयांची इमारत उभी करण्यात आली आहे.पण या इमारतीत सध्या तरी एकही नियमित अधिकारी व कर्मचा-यांचे पदें रिक्त असल्याने हा दवाखाना ओसाड पडल्या सारखं वाटतं आहे. 


या तालुका लघु पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अखत्यारीत बोडेगाव , माहेर, कुर्झा झिलबोडी,पारडगाव,किन्ही, खेड, मरारमेंढा,खरबी,तुमडीमेंढा,बेलदाटी,दुधवाही,कहाली,परसोडी, उदापूर, बोरगाव, नवेगाव,कोथुळणा ,बोंढेगाव असे अठरा गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये खरंच प्रभारी पशुधन विकास अधिकारी किती वेळ देणार हे पुढील काळच ठरवेल.ब्रम्हपुरी तालुक्यात ग्रामिण व शहरी भागात धानांच्या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाते.या तालुक्यांत प्रत्येक गावात म्हैस,शेळी,गोपालन केल्या जाते. त्यामुळे पशुधन संवर्धन विभाग अधिक सक्षम असायला पाहिजे.अशी अपेक्षा आहे.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सक्षम अधिकारी यांच्या जागाच भरण्यात येत नसल्याने पशुपालकांना चांगल्या सल्या पासुन वंचित राहावे लागत आहे.तरी तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी होत आहे.माझी बदली अर्हेरनवरगाव येथे करण्यात आली.येथील नियमित पदभार स्वीकारला आहे.येथील सर्व कामे सांभाळून ब्रह्मपुरी पशुवैद्यकीय दवाखान्याचा अतीरिक्त प्रभार सांभाळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
-डॉ.मनिष बी.लाडे
-प्रभारी साहाय्यक पशुधन विकास अधिकारी ब्रह्मपुरी