खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -
तालुका उपविभागीय कार्यालयात, तलाठी कार्यालयात चौतीस वर्षे सेवा करुन पाच हजार रुपये मानधनावर सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाच्या उदासिन धोरणामुळे कुर्झा वार्ड, ब्रह्मपुरी येथिल कोतवाल प्रल्हाद यादवराव गायधने यांना सेवानिवृत्तीनंतर काहीही मिळत नसल्यामुळे प्रल्हादवर आता उपासमारीची पाळी आली आहे.
घरी अल्पभूधारक शेती, पाच तोंड खाणारे आणि शासनाने सेवानिवृत्तीनंतर मानधन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काहीच न दिल्यामुळे २०१६ पासून कसेबसे जीवन जगत प्रल्हाद आपला संसारगाडा चालवितो आहे.
हा एकटया प्रल्हादचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातील तमाम सेवानिवृत्त कोतवाल बांधवांचा प्रश्न आहे. आम्हांला कमीत कमी तीन हजार रुपयेतरी महिण्याकाठी मानधन शासनाने द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
अनेक निवेदन दिलित, शासनाच्या निर्देश नास आणून देवूनही प्रश्न न सुटल्यामुळे कोतवाल बांधव कमालीचे नाराज असून या शासनाच्या बेजाबाबदारपणाला कंटाळल्याचे प्रल्हाद बोलून दाखवितो
एक सरकारी कचेरीतील इमानेइतबारे सेवा करणारा सेवक म्हणून कोतवालांकडे पाहिले जाते. कधी साहेब आपल्या मर्जीने पाचशे रुपये देतो तर कधी कपडालत्ता घेतो. पण सेवा संपली की, या सेवेक-याला कोणी विचारीत नाही. सरकारही दूर फेकतो.
संघटना सशक्त नसल्यामुळे कोतवालांचे सगळीकडे हाल असल्याचे प्रल्हादने सांगितले. आम्हांला बरे जीवन जगण्यासाठी तीन हजार मानधन देऊन आम्हांला न्याय द्यावा, अशी कळकळीची मागणी कोतवालांनी केली आहे.