घरकुल लाभार्थी अजुनही पैश्याच्या प्रतिक्षेत : कुर्झा-बोंडेगाव येथील घरकुल लाभार्थ्यांचे उर्वरित देयके न मिळाल्याने संतप्त. :- लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी :- कर्जामुळे कुर्झा येथील लाभार्थ्यांची किटकनाशक प्राशन करून आत्महत्या :- घरकुल लाभाच्या हप्त्यासाठी लाभार्थी मारतात संबंधित विभागाच्या चकरा #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घरकुल लाभार्थी अजुनही पैश्याच्या प्रतिक्षेत : कुर्झा-बोंडेगाव येथील घरकुल लाभार्थ्यांचे उर्वरित देयके न मिळाल्याने संतप्त. :- लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी :- कर्जामुळे कुर्झा येथील लाभार्थ्यांची किटकनाशक प्राशन करून आत्महत्या :- घरकुल लाभाच्या हप्त्यासाठी लाभार्थी मारतात संबंधित विभागाच्या चकरा #bramhapuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:- सध्या कोरोनाचा कहर चौहीकडे असल्यामुळे सहा ते सात महिन्यापासून लोकांचा रोजगार हिरावला आहे . आणि आणि बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे . 


घरकुल लाभार्थ्यांना आधी प्रमाणे च तुटपुंजे अनुदान मिळत असल्याने घरकुल लाभार्थी चिंतेत असून आधीच कमी अनुदान आणि ते ही वेळेवर हप्ते मिळत नसल्याने घरकुल बांधकाम अर्धवटच राहत असल्याने गरिबांना राहावे कुठे हा प्रश्न पडत आहे. प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे असे वाटते प्रत्येक जण घर बांधण्याची स्वन साकारत असतो . मात्र विविध कारणामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही. अशासाठी शासनाची घरकुल योजना गोरगरिबांसाठी राबवली जात आहे.


मात्र आता ही घरकुल योजना मृगजळ ठरू पाहत आहे . तुटपुंज्या अनुदानात व तेही ही वेळेवर न मिळाल्याने घरकुल बांधकाम कसे करावे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात ग्रामिण व शहरी भागात शासनाने प्रधानमंत्री व रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत अनेक गरजू लोकांना यांचा लाभ देण्यात आले. शासनाने प्रत्येक गरजु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात देयके जमा करून घर बांधकाम करण्यासाठी सुचना दिली.


अनेक लाभार्थी आपले मोडकळीस आलेले घर पाडून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. शासनाने दिलेल्या पैश्यात व शेजारी व सावकाराकडुन व्याजाने कर्ज काढून पुढील घर बांधकाम केले.पण अजुनही प्रशासनाने पुढील उर्वरित देयके दिले नसल्याने अनेक गरिबांचे संसार पाल ठोकुन संसार करत आहेत.काही लाभार्थी कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत.कारण घर बांधकाम करण्यासाठी आधीच पैसे घेतले असल्याने शेतीच्या मशागतीसाठी पैसे आणायचे तरी कुठून असा प्रश्न लाभार्थींना पडतं आहे. 


रेती सिमेंट लोहा विटा मजुरी यामध्ये झालेली वाढ सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे घर बांधण्याची स्पन अपूर्ण राहत आहेत. बोंढेगाव कुर्झा येथील घरकुल लाभार्थ्यांचे घर बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे व पहिल्या टप्प्यातील हप्ता देण्यात आला बाकी उर्वरित हप्ते अजूनही देण्यात आले नाही. अनेक लाभार्थी दारिद्र रेषेखालील असून अनेकांनी उसनवार पैसे घेऊन घर बांधकाम सुरू केले. अनेकांचे पैसे अंगावर असल्याने लाभार्थी चिंताग्रस्त पहावयास मिळत आहे. 


अशा या अडचणीवर मात करून अनेक लाभार्थ्यांनी मिळालेल्या पैसा पेक्षाही अधिक घर बांधकाम करण्यात आली आहे. पुढील अनुदानासाठी संबंधित विभागाच्या चकरा माराव्या लागत आहेत. एकीकडे मजुरीवर जावे की शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिझवावे असा प्रश्न लाभार्थींना पुढे पडलेला असतो. अनेक लाभार्थ्यांचे घर बांधकाम अडकले असून शासनाने उर्वरित देयके त्वरीत देण्याची मागणी केली जात आहे.