ब्रह्मपुरी पोलिसांची अवैध दारू तस्करां विरोधात धडक मोहीम :- पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची कारवाई..... :- ब्रह्मपुरी शहरात अवैध दारू तस्करी करणाऱ्या मध्ये भितीचे वातावरण... :- उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलीद शिंदे यांचे अवैध धंदे करणाऱ्या विरोधात बारकाईने लक्ष... :- दोन ठिकाणी अवैध दारू तस्करी करणाऱ्या विरोधात वेगवेगळ्या कारवाई....#bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रह्मपुरी पोलिसांची अवैध दारू तस्करां विरोधात धडक मोहीम :- पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची कारवाई..... :- ब्रह्मपुरी शहरात अवैध दारू तस्करी करणाऱ्या मध्ये भितीचे वातावरण... :- उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलीद शिंदे यांचे अवैध धंदे करणाऱ्या विरोधात बारकाईने लक्ष... :- दोन ठिकाणी अवैध दारू तस्करी करणाऱ्या विरोधात वेगवेगळ्या कारवाई....#bramhapuri

Share This
खबरकट्टा / ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पण ब्रह्मपुरी पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केल्याचे पाहण्यास मिळत आहे.


काही दिवसांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलीद शिंदे यांनी अवैध पणे सुरू असलेल्या कोंबडा बाजारात धाड टाकून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले होते.यामध्ये अनेक आरोपी ताब्यात घेतले होते.त्यानंतर पुन्हा आज उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलीद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती वरुन कहाली टी पॉइंट जवळ नाका बंदी लावण्यात आली.



तोरगावरून भरधाव वेगाने एक मोटर कार मारुरी झेन MH- 31-H2808 ची गाडी येत असल्याचे दिसून आले.त्या वाहनाची तपासणी केली असता ८ पेट्या अवैध दारू आढळून आले.



सदर गाडीमध्ये चालक व दोन आरोपी मनोज मिसार वय २८ , गणेश सोडवले वय २३ या दोन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आले आहे.तसेच ब्रह्मपुरी पोलिसांनी गोपनीय माहिती वरुन तोरगाव नाक्यांवर नाकाबंदी केली.एका MH- 34-BH-4282 मोटार वाहनाने ०३ पेट्या जप्त करण्यात आल्या.तीन पेट्या देशी दारू व एका दुचाकी MH-36AM- 5190 या वाहनाने OC ब्लु च्या एक पेटी व असा एकूण १,७०,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.



आरोपी वैभव वेलथरे वय २१, महेश कांबळी वय २३ यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आले आहे.या दोन कारवाई मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलीद शिंदे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, DB पथकाचे पो ह खोब्रागडे, ना पो शी मुकेश, पो शी योगेश, अजय नागोसे, अजय कताईत, पो ह नैताम,पो शी विशाल शिंदे, यांनी केली.