ब्रह्मपुरी तालुक्यात आज दुपारी अचानक वातावरण बदलून पाऊस व विजेचा कडकडाट सुरू होता.या गडगडाटात विज पडून दोघे पतिपत्नी ठार झाले आहेत.
ब्रह्मपुरी तालुक्यातील पारगाव येथील दाम्पत्य काही कामासाठी ब्रह्मपुरी ला गेले असता आपले काम पूर्ण करून गावाकडे जाण्यासाठी आपल्या दुचाकीने जात असताना अचानक विजेचा कडकडाटात होऊन भगवती राईस मिल उदापूर जवळ वीज पडून दोघेही पती-पत्नी पिंटू मोतीराम राऊत वय ३० व पत्नी गुंजन पिंटू राऊत वय २६ यांच्या वर विज पडून जागीच ठार झाले.