आजच्या युवा पिढीला प्रेमाचे मोठें ग्रहण लागल्याचे पाहवयास मिळत आहे.अनेक मुलं- मुली आपला जिवन साथी स्वताच्या स्वयं इच्छेने करत असतात.
वआई - वडिलांच्या स्वप्नांना बगल देऊन मर्जीतील मुला सोबत विवाह करत असतात.अशामध्येच ब्रह्मपुरी तालुक्यातील चिंचोली येथील राकेश हरीदास मेश्राम वय २३ व बोडधा येथील राखी दिलीप कोटगले वय १८ यांचे काही दिवसांपासून एकामेकांचे जिवापाड प्रेम होते.
दोघांनी संसारी जीवन एकत्र करण्याचा निर्णय घेतला.पण राकेश हा दुसऱ्या जाती असल्यांने राखीच्या घरच्यांचा विरोध असल्यानेत्यामुळे दोघांनी हनुमान मंदिर कुर्झा येथील सदस्यांना आपली प्रेम कथा व आप बीती सांगितले व लग्न करण्यास तयार असल्यास कबूल केली.
त्यानंतर हनुमान मंदिर कुर्झा येथील सदस्यांनी घेऊन या प्रेमयुगलांचा विवाह सोहळा संपन्न पार पडला या विवाह सोहळ्यात अनेक गावातील मंडळी उपस्थित होते व वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले.