विद्युत शॉकने शेतकऱ्याचा मृत्यू #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्युत शॉकने शेतकऱ्याचा मृत्यू #bramhapuri

Share This
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :- 


ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई येथिल शेतकरी दिगांबर नागमोती (55) यांचा दुपारी बारा वाजता घरच्या शेतात विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.13 सप्टेंबर ला घडली.

रुई येथील शेतकरी दिगांबर नागमोती यांचे शेती खरकाडा फाट्याजवळ आहे. नागमोती हे सकाळी शेतावर गेले होते धान पिकासाठी पाण्याची गरज असल्याने मोटरपंप चालू केले. 


शेताला पाणी झाल्याने मोटर बंद करण्यासाठी दिगांबर नागमोती गेले असता मोटार बंद करीत असताना विद्युत शॅक लागून दिगांबर नागमोती यांचा मृत्यू झाला.हि दुर्दैवी घटना मुलाच्या डोळ्यासमोरच घडली.


शवविच्छेदनाकरिता मृतकाला ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरीला येथे नेण्यात आले. त्याच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचे डोगर कोसळले आहे. परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.