शरद जोशी यांची जयंती रक्तदानाने साजरी 🩸 शरद जोशी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्याचे जनक -- ऍड. वामनराव चटप #blood donation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शरद जोशी यांची जयंती रक्तदानाने साजरी 🩸 शरद जोशी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्याचे जनक -- ऍड. वामनराव चटप #blood donation

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा ,दिनांक ३ सप्टेंब़र - 


शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांची ८६ वी जयंती दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन साजरा केली. दिनांक ३ सप्टेंबरला झालेल्या या रक्तदान शिबीरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ऍड.वामनराव चटप म्हणाले की, शरद जोशी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेला घामाच्या दामाचा मंत्र देऊन त्यांना वाचविण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्याचा लढा उभा करतानाचा स्वाभिमान जागा केला. यातूनच त्यांनी शेतीवर जगणाऱ्या माणसाच्या आर्थिक बाबींचे विश्लेषण करून त्याच्या मनाला उभारी देण्याचे काम केले.म्हणून युगात्मा शरद जोशी यांच्या जयंती दिनी दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते आणि आरोग्याच्या संकटातून माणसाला वाचविण्याचा प्रयत्न होत असतो. रक्तदान शिबिराचे हे विसावे वर्ष आहे.राजुरा ग्रामीण रुग्णालयापुढील राम मंदिर सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात माजी आमदार ऍड. वामनराव चटप, ऍड. मुरलीधर देवाळकर,निळकंठराव कोरांगे,अरुण नवले, बाजार समिती सभापती कवडू पोटे,शेषराव बोंडे,प्रभाकर ढवस,अनिल ठाकुरवार,रमाकांत मालेकर,पंढरी बोन्डे, सुभाष रामगिरवार,ऍड.राजेंद्र जेनेकर, ऍड.श्रीनिवास मुसळे,मधुकर चिंचोलकर,कपिल इद्दे,भास्कर मत्ते, सुरेश आस्वले,राजकुमार डाखरे, शुभम रासेकर,स्वप्नील पहानपटे,बळीराम खुजे,डॉ. गंगाधर बोढे,दीपक चटप,गजेंद्र झंवर,निखिल बोण्डे,सुरज गव्हाणे,अजझर हुसेन,सूरज जीवतोडे,केतन जुनघरे,उत्पल गोरे यांचेसह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले.या रक्तदान शिबिरासाठी राजुरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुळमेथे,चंद्रपूर शासकीय रक्तपेढीचे पंकज पवार,जयसिंग डोंगरे,अपर्णा रामटेके,विशाल सहारे,लक्ष्मण नगराळे,रुपेश घुमे यांनी रक्तसंकलन करून सहकार्य केले.