रोजगार संधी ! मशरुम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रोजगार संधी ! मशरुम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर :



महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 10 ते 13 सप्टेंबर (3 दिवस) कालावधीचे मशरुम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.


सदर प्रशिक्षणामध्ये मशरुमचे प्रकार व ओळख, लागवड, साहीत्य व कच्च माल, काळजी व  देखभाल, मशरुम  काढणे, वाढविणे व पॅकेजींग प्रकिया, रोग, किड, निदान व उपचार, खाद्य पदार्थ व अर्थशास्त्र, बाजारपेठ पाहणी तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतीनी त्वरीत दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे.


अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.नं. 9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो.नं.9011667717),लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.