नायकाने केली वासनेच्या कळसातून गनफायरिंग.... !!! #gunfiring - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नायकाने केली वासनेच्या कळसातून गनफायरिंग.... !!! #gunfiring

Share This
लॉकडाऊनच्या काळात सर्रास गोळ्या चालविण्यात आल्याच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्याच हादरून गेला. याच दरम्यान एक अशीही घटना घडली ज्यात खुल्या पद्धतीने बेछूट गोळीबार करण्यात आला. मात्र त्या घटनेचे राजकीय वजनंच एवढे होते की त्याची वाच्चता करायला प्रत्यदर्शीही घाबरले. तरी त्याची कुरबुर अद्यापही सुरू आहे. जिल्ह्यातील मोठे वजन असलेल्या नायकाच्या दुसऱ्या पैलूची ही कहाणी आहे.

खबरकट्टा / चंद्रपूर : 5 सप्टेंबर -


एरव्ही चंद्रपूर जिल्ह्यात गनफायरिंग हा शब्द कमालीचा ओळखीचा झाला आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व त्यातून जन्माला आलेली गल्लीबोळातील भाई गिरी. त्याचा माज मिरविण्यासाठी हातात आलेले खेळणे म्हणजे " गन-बंदूक ". 

 

फक्त दहशत निर्माण करण्याच्या हेतूनेच नव्हे तर स्टेटस सिम्बॉल ची जागा सुद्धा बंदुकी सारख्या हत्याराने घेतली आहे.अवैध धंदे करणाऱ्या भाईंनी आता ‘मुळशी पॅटर्न’ मधल्या ‘आम्ही ठोकत नाही, तर डायरेक्‍ट तोडतो’ हाच विचार आत्मसात केल्याचे दिसून येत आहे. याच मानसिकतेतून जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पोलिसांची डोकेदुखी वाढवणाऱ्याच असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी, लुटमार पोलिसांची डोकदुखी बनली आहे. दररोज होणाऱ्या हाणामारीमध्ये शस्त्रांचा वाढलेला वापराने शहरात गुन्हेगारी किती खोलवर रुजलेली आहे याचीच जाणिव करुन देत आहे. 


दोन गटामध्ये झालेल्या वादात कोयता, तलवार, देशी कट्टे यासारख्या शस्त्रांचा वापर सर्रास होत आहे. याच शस्त्रांचा वापर आता नागरिकांना धमकावून त्यांना लुटण्यासाठीही होवू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षितता आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे. 


ज्या वयात अभ्यासाची गोडी अन्‌ भविष्य घडविण्याची जिद्द असायला हवी त्या वयातच अनेकांच्या हातांमध्ये शस्त्रे दिसू लागली आहेत. याचे बोलके उदाहरणं म्हणजे लॉकडाऊन काळात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हे शाखांनी काही ठिकाणी संशयास्पद हालचालीतून जप्त केलेले अवैध देशी कट्टे व तलवारी देतात.

कलम है गुमनाम यहां... 
बंदूक है खुलेआम यहां... 
कतल मचता है, भरे बाजार मे यहां.... 
रो रही है एक बुढी माई यहां...
मरता देख बेटे को यहां... 
सारा आलम है चूप यहां... 
क्या कोई नहीं है माई का लाल यहां....!!!


लॉकडाऊन काळात चंद्रपूर जिल्ह्यात गनफायरिंग च्या दोन्ही मोठ्या घटना हादरवून सोडणाऱ्या होत्या. पहिल्या घटनेत स्वतः सुरक्षा रक्षकालाच कौटुंबिक वादातून बेछूट गनफायरिंग करत स्वतःच्याच मुलासहित जीव गमवावा लागला. तर निव्वळ कोळसा चोरीच्या विवादित पैश्यातून (? )दुसरे खुलेआम हत्याकांड घडले.


या दोन्ही घटनांतील आरोपींचा वादातीत द्वेष जरी असला तरीही सहज उपलब्ध झालेली गण व त्याचा वापर करताना असलेला निर्धास्तपणा, गण - बंदूकीच्या वापराबद्दल युवकांच्या मानसिकतेत रुढावत चाललेला मस्त मौलेपणा कारणीभूत ठरत आहे. 


परंतु या दोन्ही घटनांच्या व्यक्तिरिक चंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊन काळातील आणखी एक गनफायरिंग ची घटना चांगलीच चर्चेत आहे. त्या घटनेतील नायकाच्या राजकीय वजन व भीती पोटी दबक्या आवाजात का असेना कुजबुज मात्र हवेच्या गतीने पसरत आहे.या वायरल हवेनुसार सिनेमात घडणाऱ्या धांदलीत तणाव निवळण्यासाठी नायकाने गनफायरींग करावी तसें साधर्म्य याही घटनेत आढळते. जिल्ह्यातील एका बडया व अवैध धंद्याच्या मसीहा बनलेल्या नायकाच्या विश्वस्थाच्या आरामगृहात प्रेयसी सोबत रासलीला सुरु असताना मध्यरात्री अचानक पत्नीनेच आपल्या ताफ्यासहित धाड टाकली असता रात्रीच्या त्या काळोखात प्रचंड गरदोळ उडाला. मद्यधुंद नायकाने हा थैमान घालणारा गरदोळ शमविण्याकरिता मिनिटाचाही विलंब न करता खुली गनफायरिंग केल्याने रात्रीचा निवांत परिसर हादरला. 


या आवाजाने घाबरून परिसरातील अनेक व्यक्तींनी प्रशासनाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळाने हा सर्व प्रताप या मसीहा महाशयांचा असल्याचे लक्षात आले व  दबावतंत्राने कोणतीही कार्यवाही झाली नाही. यापूर्वीही अवैध धंद्याच्या प्रकरणातून याच नायकाने एका बड्या नेत्याला बंदुकीच्या धाकावर धमकावल्याच्याही चर्चा अधून मधून कानी येतात. 


जर राजकीय वजन असेल तर प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणाच अशा प्रकाराला कसे दडवतात ह्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मात्र, सूर्याला(सत्याला ) कितीही झाकलं तरी सूर्य उगविल्याशिवाय राहत नाही. हे प्रकरण अजून समोर आले नसले तरी याची खमंग चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. 

शेवटी एवढेच...... 

माना की कुछ घोसलों पर तुम्हारी नजर है, 
लेकिन समय का तालमेल भी तो जरुरी है.... !!
नहीं तो मौसम की मार से इधर बंदूक तुम्हारी खराब होगी, 
और उधर 
बदलावं के लिये जनता की उंगलीया उठेंगी, .... !!!