भाताची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील भात, संपुर्ण देशात प्रसिध्द असून विविध राज्यात येथील भाताची मोठया प्रमाणात निर्यात केली जाते. कर्मवीर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. राजेश्वर राजुरकर यांनी आपल्या शेतात रासायनिक शेतीला नाकारुन पुर्णपणे सेंद्रिय पध्दतीने शेती करण्यावर विशेष भर देत आहेत.
प्रा. राजुरकर यांनी दोन वर्षापासून आपल्या शेतात संशोधनपर प्रयोगाकरीता ब्लॅक(कुवूरी) भात व ग्रीन (कस्तुरी) भात या वाणाची लागवड केली असून ते आरोग्यास हितकारक आहे.
पोषण मुल्य भरपूर प्रमााणात असलेला ओषधी गुणधर्म युक्त या वाणाचा कालावधी 110 ते 120 दिवस असून उंची 90 ते 120 सेमी तर एकरी उत्पन्न 12 ते 15 क्विंटल असल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रपूर येथे ८ व ९ फेब्रुवारी 2020 मध्ये पार पडलेल्या कृषी प्रदर्शनी मेळाव्यात या भाताला चांगली मागणी होती.
या वानाचे वैशिष्ट म्हणजे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करते, लठठपणा रोखण्यात मदतगार, हदय व रक्तवाहिण्यांसंबंधी आजारावर प्रतिबंधात्मक, मधुमेह, कर्करोग, यात व्हिटॅमिन ई असल्याने डोळा, त्वचा तसेच रोगप्रतिकारक आरोग्य राख्ण्यासाठी उपयुक्त, अनेक आजारावर गुणकारी ब्लॅक राईस (कुवूरी) वाण असल्याचे प्रा. राजुरकर यांनी आमचे प्रतिनिधीजवळ सांगितले.