संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांचा पुढाकार #bjym - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांचा पुढाकार #bjym

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरपना तालुक्यातील गांधीनगर येथे गांधीनगर व तुळशी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या पुढाकारातुन मार्गदर्शन करण्यात आले.तालुक्यातील अनेक गावात संजय गांधी निराधार योजनेचे अनेक लाभार्थी आहेत परंतु त्यांना कागदपत्रे माहिती नसल्यामुळे अनेक लाभार्थी या योजने पासून वंचित राहत आहेत तसेच त्यांना कागदपत्रे उपलब्ध असून सुद्धा संजय गांधी निराधार योजनेची अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया सुद्धा माहिती राहत नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे,त्याचीच दखल घेऊन भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी गांधीनगर येथे गांधीनगर व तुळशी येथील लाभार्थ्यांना सदर योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व या योजनेला लागणारे कागदपत्रे जसे 21 हजारचा उत्पन्न दाखला असेल बिपियल दाखला असेल व अन्य कागदपत्राबद्दल सविस्तर माहिती दिली.


यावेळी बंडू पाटील मालेकर, सत्यवान चामाटे, विजय बोबडे,नैनेश आत्राम,किशोर देवतळे,शंकर पावडे,गणेश महाकुलकर,महेंद्र बोबडे,सुधीर पेटकर, नितेश वासेकर उपस्थित होते.गाधीनगर व तुळशी येथील सदर योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.