खबरकट्टा / चंद्रपूर :
कोरोनाच्या संक्रमणाने हे सिद्ध केले आहे की सामान्य नागरिकांपासून राजकारण्यापर्यंत प्रत्येकासाठी समान आहे. आजकाल कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक कर्फ्यू सुरू आहे.
पण कोरोनाच्या या पावसात घुग्गुस शहरात भाजपणे आता आपली 'राजकीय छत्री' उघडली आहे. घुग्घुस येथे त्यांच्याद्वारे वितरीत केलेली छत्री चर्चेचा विषय बनली आहेत.
जिल्ह्यात जनता कर्फ्यु सुरू असतांना ही दिनांक 26 सप्टेंबर रोजी येथील मुख्य मार्गावरील प्रयास अर्बन को - ऑपरेटिव्ह सोसायटी लि. घुग्गुस येथे शेकडो महिलांची गर्दी जमली होती.ज्या महिला या संस्थेचे सभासद आहेत व ज्या महिलांनी शंभर रुपयाचा भरणा केला आहे व त्याची पासबुकात नोंद आहे अशा महिलांना एक छत्री वाटप करण्यात येत असून या छत्रीवर कमळ चिन्ह व फोटो आहे.
कोरोनाच्या संक्रमण काळात भाजपाने अशी गर्दी जमविण्याच्या योजनेची सर्वसामान्य नागरिकांमध्ये टीका केली जात आहे. चर्चा आहे की छत्री वाटप करण्याची ही योजना अशा वेळी होऊ नये.म्हणून आम्ही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता यात प्रयास अर्बन को - ऑपरेटिव्ह सोसायटीची अनोखी शक्कल आढळून आली.
छत्री उघडल्यानंतर सोशल डिस्टन्स आपोआप तयार होते, तसेच उन्ह व पावसापासून संरक्षणही होणार आहे, त्यासाठी घुग्गुस वासियांनी छत्रीसोबत संगत वाढवावी.या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या प्रत्येकाला सोबत छत्री घेऊन येण्याचे व उपयोग करण्याचे आवाहन प्रयास अर्बन को - ऑपरेटिव्ह सोसायटी ने केले आहे.
घुग्गुस शहर व लगतच्या परिसरात दोनशे च्या जवळपास करोनाबाधित रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. कोणीही घराबाहेर शक्यतो पडू नका. छत्रीचा प्रयोग सोशल डिस्टन्स करिता अनेक राज्यांत आणि देशांत यशस्वी झाला आहे.