बाबुरावजी कोहळे यांची भाजपच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती #bjp - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाबुरावजी कोहळे यांची भाजपच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती #bjp

Share This
खबरकट्टा / विदर्भ -


भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा दिशा समितीचे सदस्य श्री बाबुरावजी कोहळे यांची भाजपच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.



श्री बाबुरावजी कोहळे हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत सक्रिय असून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी तेव्हापासून पक्षासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळेच जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा आलेख वाढलेला आहे. 


त्यांच्या या सेवाभावी व पक्षहितार्थ कार्याची दखल घेऊन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांची नियुक्ती पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदावर केलेली आहे.



भारतीय जनता पार्टीसाठी तन, मन धनाने कार्य करणारा मी एक सच्चा कार्यकर्ता असून यापुढेही गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील संघटन मजबूत करण्यावर आपण भर देणार असून सर्व जिल्ह्यात संपर्क दौरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रदेश अध्यक्ष तथा पक्षश्रेष्ठींचे त्यांनी आभार मानले आहे.