बादल बेले यांच्या वाढदिवसानीमीत्य धान्य व किराणा कीट चे गरजुना वाटप. - शेताच्या बांधावर केले वृक्षारोपण : #badal-bele - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बादल बेले यांच्या वाढदिवसानीमीत्य धान्य व किराणा कीट चे गरजुना वाटप. - शेताच्या बांधावर केले वृक्षारोपण : #badal-bele

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष बादल बेले यांच्या वाढदिवसानीमीत्य गरजूना धान्य व किराणा कीटचे वाटप करण्यात आले. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीप सदावर्ते ,उपाध्यक्ष ,नेफडो ,राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथि म्हणून सारीपुत्र जांभूळकर ,मुख्याध्यापक ,आदर्श हायस्कूल राजुरा ,सुनैना तांबेकर ,तालुका संघटीका नेफडो , रुपेश चिड़े ,बंडू बोढे ,नवनाथ बुटले , धनराज अतकारे ,नीलकंठ बेले, शीला बेले, सुवर्णा बेले , दुर्वा बेले संगीता तोकलवार , धनंजय डवरे आदिंचि प्रामुख्याने उपस्थिती होती. 
यावेळी राजुरा येथील गरीब वस्तीतील गरजूना धान्य व किराणा कीट चे मोफत वितरण करण्यात आले. तसेच परिवारातील सदस्यांनी तूलाना गावातील शेताच्या बांधावर व्रूक्षारोपन केले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधीकारीचे सहकार्य लाभले.