शेगाव जि. प. शाळेला शंभर वर्षे झाल्याने काही माजी विद्यार्थी एकत्र येऊन व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, शिक्षक झाले. अनेक विद्यार्थी जीवनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या शाळेतूनच त्यांनी आयुष्याची बाराखडी शिकली.
पुढचे शिक्षक घेवून आयुष्यात प्रगती करण्याची संधी मिळाली. त्यामुळे शाळेसाठी मदत करूया या भावनेने माजी विद्यार्थ्यांनी काही रक्कम जमा केली.त्यामुळे शाळेसाठी मदत करूया या भावनेने माजी विद्यार्थ्यांनी काही रक्कम जमा केली. त्या रक्कमेतून शाळेसाठी विद्युत फिटिंग व काही आवश्यक सामान घेऊन दिले.
🔰 विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी घटना
बऱ्याचवेळाम मदतीसाठी सरकारकड बोट दाखविले जाते. मात्र,नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी असते ही भावना माजी विद्यार्थ्यांमध्ये रूजली. यातूनच शाळेसाठी काही करू शकतो ही संकल्पना प्रत्यक्षात पूर्ण होवू शकली. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांचेही योगदान मोठे आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना शेगाव येथील शाळेची दुरुस्त्या होवू शकली. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी आपणही मदत केली पाहिजे, हा विचार आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
🔰 शताब्दीनिमित्त करणार मदत
शाळेच्या शताब्दी वर्षात पुन्हा जमेल तेवढी मदत देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे. संस्काराची शाळा ही भावना त्यांच्या मनात आहे. शाळा जिल्हा परिषदेची असूनही मदत कशाला करायची, असा विचार विद्यार्थ्यांच्या मनाला शिवला नाही.
मात्र, जिल्हा परिषद शाळेने आपल्या चांगले संस्कार केले. शिक्षकांनी वळण लावले. त्यामुळेच आपण काही देणे लागतो हा विचार त्यांनी कृतीत उतरवून दाखवला. त्यामुळे पालकांनीही आनंद व्यक्त केला आहे.