चंद्रपूर जिल्ह्यात वाढते कोरोना रूग्ण आणि मृत्यूसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात समूह संसर्गाची भिती व्यक्त होऊ लागली आहे.गेल्या फक्त 5 दिवसात 1000पेक्षा अधिक पॉसिटीव्ह रुग्ण समोर आले आहेत. चंद्रपूर शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी , व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून येत्या बुधवार पासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करावा , असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज दि .5 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
3सप्टेंबर पासून होणाऱ्या लॉकडाऊन ची परवानगी नाकारल्यानंतर जनता कर्फ्यू साठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगीतले.