रानडुक्करावर ताव मारणार्‍या 9 जणांना अटक #9 arrested for killing wild boar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रानडुक्करावर ताव मारणार्‍या 9 जणांना अटक #9 arrested for killing wild boar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


उभे असलेले पिक रानडुक्कर फस्त करीत असल्याने उश्राळा येथील एका शेतकर्‍याने आपल्या शेतात विद्युत प्रवाह लावला. दरम्यान, विद्युत धक्क्याने एका रानडुक्कराचा मृत्यू झाला. 


मृत्युमुखी पडलेल्या रानडुक्करावर ताव मारणााया 11 जणापैकी 9 जणांना अटक केली. ही कारवाई शनिवार, 12 सप्टेंबर रोजी वनविभागाने केली. ही घटना मूल तालुक्यातील बफर क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उश्राळा शेतशिवारात घडली.


वनविभागाच्या बफर क्षेत्रात वन्यप्राण्याची मोठी रेलचेल असते. याठिकाणी रानडुक्करांचा कळप नेहमीच रस्ता पार करीत असतांना नागरीकांनी बघीतले. काही दिवसांपुर्वी रेल्वेनी चिरळुन सुमारे 18 रानडुक्करांचा मृत्यू झाला. दरम्यान, उश्राळा, भादुर्णा परिसरातही मोठया प्रमाणावर रानडुक्करांचे वास्तव्य आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांचे पिक फस्त करीत असल्याची शेतकर्‍यांची ओरड आहे. 


दरम्यान, रानडुक्कर शेतातील पिक फस्त करीत असल्याने चिखली येथील अनिद्र मारोती गेडाम यांनी उश्राळा येथील शेतात शुक्रवारी विद्युत प्रवाह पसरविला. त्यात एका रानडुक्कराचा मृत्यू झाला. 


उश्राळा येथील मुरारी तुकाराम बेंदरे (70), भगवान भिवाजी मडावी (40), रेवण दुर्योधन कुळमेथे (32), मुरलीधर भिवाजी मडावी (45), दिलीप सदु पेंदोर (49), अनिल केशव तिवाडे (40), महेश गिरीधर तिवाडे (26), देवनाथ लिंगा तिवाडे (38) यांच्यासह दोन जणानी गेडाम यांच्या शेतात शुक्रवारी रानडुक्कराला कापून पार्टी केली. 


या घटनेची माहिती गावातील एका व्यक्तीने वनविभागाला दिली. वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षत्राधिकारी जी. आर. नायगमकार यांनी घटनास्थळावर जावुन चैकशी केली असता रानडुक्कराची शिकार करून पार्टी केल्याचे सिध्द झाले. 


रानडुक्करावर ताव मारणााया 9 आरोपींना वनविभागाने अटक केली. तर दोन आरोपी फरार आहेत. आरोपींवर भारतीय वन्यजीव कायदा 1972 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.