संतापजनक ब्रेकिंग : चंद्रपुरात श्रीमंतांसाठी 700बेड चे जम्बो कोविड सेंटर??? : गरिबांचे काय : बघा शांकुंतला फार्म्स येथे उभे होत असलेल्या कोविड सेंटर चे इक्सकॅलुसिव्ह फोटो : वाचा सविस्तर #jambo-covid-center-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संतापजनक ब्रेकिंग : चंद्रपुरात श्रीमंतांसाठी 700बेड चे जम्बो कोविड सेंटर??? : गरिबांचे काय : बघा शांकुंतला फार्म्स येथे उभे होत असलेल्या कोविड सेंटर चे इक्सकॅलुसिव्ह फोटो : वाचा सविस्तर #jambo-covid-center-at-chandrapur

Share This
चंद्रपुरात नागपुरातील काही व्यावसायिक कंपन्या चंद्रपुर-नागपूर महामार्गावरील शंकुतला फार्म येथे सातशे खाटांचे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे जम्बो कोविड सेंटर उभारत आहे. परंतु या सेंटर मध्ये तुमची आर्थिक कुवत बघून बेड देण्यात येणार असून जिल्ह्यातील एका बड्या नेता व अधिकाऱ्याची यात हिस्सेदारी असल्याची चर्चा नागपुरातील वैद्यकीय व्यावसायिक वर्तुळात आहे. 
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरोना विशेष : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार पार झाली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने दररोज 200पेक्षा अधिक बाधित समोर येत आहेत. अश्यातच जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय व्यवस्था कोलमडल्याचे जिल्हा ते ग्रामीण स्थरावर चित्र आहे. सर्व कोविड केअर सेंटर चि स्थिती भरगच्च आहे. रुग्णांना बेड मिळविण्यासाठी 24 ते 48 तासांचा कालावधी लागत आहे. ग्रामीण स्तरावरून जिल्हा स्तरावरसुद्धा येणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या वाढतच आहे. यातून रुग्णाची हेळसांड होऊन मृत्यू झाल्याचि तक्रार नातेवाईक सातत्याने करत असून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. अश्यातच येत्या आठ दिवसांत चंद्रपुरातील आरोग्य यंत्रणेची स्थिती बदलेल, अशी घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. मात्र, एकाही नव्या खाटाची आणि डॉक्टरची व्यवस्था कोविड उपचार केंद्रात झाली नाही. 
दुसरीकडे नागपुरातील काही व्यावसायिक कंपन्या चंद्रपुरात सातशे खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर उघडण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा निवडक चंद्रपूरकरांना होईल. खासगी कोविड सेंटर मात्र गरिबांना परवडणारे नाही. त्यांना शासकीय रुग्णालयातच खाटांची वाट बघत जीव गमवावा लागणार आहे.
मार्च महिन्यात टाळेबंदीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ कोरोना संकटाबाबत गंभीर इशारे देत होते. पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढली आणि तिथे शासकीय यंत्रणेने जम्बो कोविड केअर सेंटर निर्माण केले. 
मागील दोन महिन्यांपासून चंद्रपुरात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे. गावखेड्यात कोरोना बाधित सापडत आहे. मात्र, येथे आरोग्य सुविधा निर्माण करण्यात प्रशासनाला अपयश आले. कोविड केअर सेंटरमधील अतिदक्षता विभागात चाळीस रुग्णांमागे एक डॉक्टर आणि तीन परिचारिका आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची देखभाल होत नाही. परिणामी मृतांचा आकडा वाढत आहे. 
चंद्रपुरातील नागपूर महामार्गावरील शंकुतला फार्म येथे सातशे खाटांचे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिमटप्पात आहे. सुरवातीला तीनशे खाटांचे व्हेंटिलेटर युक्त अतिदक्षता येथे निर्माण करण्यात येत आहे. 
या ठिकाणी रुग्णांना एका दिवसाचे जवळपास 8 ते 12 हजार रुपये मोजावे लागेल. यात औषधी आणि इतर चाचण्यांचा खर्च वेगळा असेल. याचा फायदा चंद्रपुरातील श्रीमंत लोकांना होईल. परंतु गरिबांना या जम्बो कोविड सेंटरची पायरी पैशाअभावी चढता येणार नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेने स्वतःचे रुग्णालय उभे केले पाहिजे. त्याशिवाय गरिबांचा जीव वाचणार नाही. 

यासंदर्भात महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी या जम्बो कोविड केअर सेंटर ने मनपा कडे परवानगीसाठी अर्ज प्राप्त झाला असल्याचे सांगितले. मात्र, वैद्यकीय दंडकानुसार सर्व सोयी सुविधांची तपासणी केल्यानंतरच खासगी कोविड केअर सेंटरला मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.