धक्कादायक चंद्रपूर ब्रेकिंग : ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात कोरोना आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता : परंतु त्या 700 बेड खाजगी कोविड रुग्णालयांची स्थापना आताच्या घडीची गरज #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक चंद्रपूर ब्रेकिंग : ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात कोरोना आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता : परंतु त्या 700 बेड खाजगी कोविड रुग्णालयांची स्थापना आताच्या घडीची गरज #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -


चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवातीचे काळात कोरोना विषाणूचा संसर्ग मर्यादेत असल्याने उपलब्ध आरोग्य यंत्रणा पुरेशी होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य विषयक उपलब्ध यंत्रणा आणि आवश्यक असलेली आरोग्य यंत्रणा यांचे प्रमाण व्यस्त झाले.
कोरोना संसर्गाच्या प्रोजेक्टेड फिगर विचारात घेता माहे सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील एकूण केसेस 20000 सुमारास राहणार असून त्यापैकी ऍक्टिव्ह केसेस 10000 च्या सुमारास राहणे अपेक्षित आहे. याचाच अर्थ किमान 1500 रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा असलेल्या खाटा तर 500 अतिदक्षता विभागाच्या खाटांची आवश्यकता भासणार आहे. 
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 1100 खाटांची उपलब्धता असून यापैकी ऑक्सिजन पुरवठा असलेले 421 तर 90 खाटाकरिता अतिदक्षता विभागाची सुविधा आहे.
माननीय पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात जिल्हा स्तरावरून जे व्यापक नियोजन केले गेले त्यामध्ये सुमारे 1000 ऑक्सीजन पुरवठ्यासह खाटांची उभारणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तथापि या नियोजित खाटा प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यास काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पुनश्च ऑक्टोबर महिन्यातील रुग्णांची त्यात भर पडून हीसुद्धा यंत्रणा कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका त्याचप्रमाणे आवश्यक इमारती यांचा विचार करता अधिकच्या शासकीय वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यावर मर्यादा आहेत.
महानगरपालिका चंद्रपूर यांचेकडे उपलब्ध वैद्यकीय स्टाफ अत्यन्त तोकडा पडत असल्यामुळे महानगरपालिका स्तरावर सुद्धा अशा प्रकारची रुग्णालय उभारणी करता येणे शक्य नाही
चंद्रपूर शहरातील एकूण 17 खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांसाठी प्रशासनातर्फे ताब्यात घेण्यात आलेली आहे. यामधील खाटांची एकूण संख्या 334 इतकी असून यापैकी 211 खाटांना ऑक्सिजन पुरवठा ची सोय आहे तर यापैकी केवळ 40 खाटांसाठी अतिदक्षता सोय उपलब्ध आहे.
याचाच अर्थ खाजगी रुग्णालयातील एकूण खाटांची संख्या विचारात घेता एकूण 1434 इतकी असून यापैकी 632 खाटांना ऑक्सिजन पुरवठा ची सोय आहे तर केवळ 130 खाटा अतिदक्षता विभागात येतात.
या पार्श्वभूमीवर सर्वंकष विचार करून त्याचप्रमाणे इतर महानगरपालिका येथिल चांगल्या प्रॅक्टिस विचारात घेऊन महानगरपालिका स्तरावर हॉटेल व्यावसायिक, लॉन मालक, सभागृह संचालक तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आणि समाजाची वैद्यकीय सेवांची नितांत गरज लक्षात आणून देण्यात आली. या दोन्ही घटकांनी एकत्र येऊन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्या असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला अनुसरून डॉ.मंगेश गुळवाडे आणि डॉ. अनुप वासाडे यांनी प्रस्ताव सादर केले असून त्यांना तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
अश्या प्रकारे खाजगी अधिक खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारले गेल्यास या वैद्यकीय व्यावसायिकांचे मूळ रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकेल आणि त्याद्वारे त्या रुणांसाठी मोठा फायदा होईल.
अशा रुग्णालयांची महानगरपालिका स्तरावरून बारकाईने पाहणी करण्यात येऊन सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्याबाबत त्याचप्रमाणे अग्निशमन व्यवस्था नियमानुसार पुरविली असल्याची खात्री करण्यात येईल. याशिवाय अशा रुग्णालयांनी कोविड रुग्णांचे शुश्रूषा करताना शासनाने निश्चित करून दिलेल्या दरानुसार फी आकारणी करावी याबाबत ऑडिट टीम द्वारे कटाक्षाने लक्ष दिले जाईल. 
थोडक्यात सरकारी प्रयत्नांनी महत्तम क्षमतेने वैद्यकीय सुविधांची उभारणी केल्यानंतरही अश्या खाजगी रुग्णालयांची उभारणी ही काळाची गरज असून अश्या रुग्णालयांमुळे कोरोना काळात वाढलेल्या रुग्ण संख्येसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध होतील आणि जनमानसात त्यांना कोरोना झाल्यास वैद्यकीय सुविधेच्या उपलब्धतेबाबत आश्वासकता निर्माण होईल. यातून काही अत्यवस्थ रुग्णांना Golden Hour च्या काळात संजीवनी उपलब्ध होऊ शकेल, ही या प्रयत्नांची सर्वात मोठी उपलब्धता ठरेल.