कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे असे असताना च महावितर नाच्या भोगळ कारभारामुळे नागरीका ना नाहक त्रास सहन करावे लागत आहे चिमूर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) येथील एका विधवा व मोडक्या घरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला तब्बल 65 हजार 520 रुपये इतके बिल महावितरणने पाठविले आहे.
विधवा महिलेला दोन खोल्याचं लाईट बिल 65 हजार 520 रु इतका आला आहे.एका गरीब विधवेच्या घरी वीजेची थोडीफार उपकरणं असतानाही तिला हजारो रु बिलं पाठवण्यात आली आहे.वनिता उत्तम शिवरकर असे या विधवा महिलेचे नाव आहे.
लॉक डाउन च्या पार्श्वभूमीत हाताला काम नसताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची? असा प्रश्न या विधवा महिलेस पडला आहे..एखाद्या कंपनीला येईल असे बिल आले आहे त्यामुळे विज बिल भरणे कठिण झाले आहे .
या बिला संदर्भात भ्रमणध्वनी द्वारे विचारणा केली असता बिला बद्दल चौकशी करण्यात येईल काही त्रुटी असल्यास दुरुस्ती करण्यात येईल-ओ. अ. मुकादम
महावितरण कनिष्ठ अभियंता चिमूर