ग्राम पंचायतींचा कारभार शासकीय प्रशासकांच्या हाती : 580 ग्राम पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात #grampanchayat - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्राम पंचायतींचा कारभार शासकीय प्रशासकांच्या हाती : 580 ग्राम पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात #grampanchayat

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


जिल्ह्यातील 580 ग्रामपंचायतींमधील सरपंच-उपसरपंचपदांचा कार्यकाळ संपुष्टात आला. पण, कोरोना आपत्तीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने अखेर शासनाच्या निर्देशान्वये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 


आता 580 ग्राम पंचायतींचा कारभार पंचायत समितीस्तरावरील प्रशासक बघणार आहे. प्रशासक कोण बसावे, यावर बराच वाद झाला. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांनी हा विषय रेटला आणि त्यांच्या पुढाकाराने प्रशासक हा शासकीय व्यक्ती असेल, हे ठरले आहे.
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील 580 ग्राम पंचायतींचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपला. या काळात संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. पण कारोनाने ते शक्य नसल्याने संबंधित ग्राम पंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून शासन-प्रशासन स्तरावर सुरू होती. अखेर शासनाने जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. तसे आदेश निर्गमित झाले असून, या महिन्यात वेगवेगळ्या तारखांमध्ये नियुक्त प्रशासक ग्राम पंचायतींचा पदभार स्वीकारणार आहेत.चंद्रपूर तालुक्यातील 20 ग्राम पंचायतींमध्ये प्रशासक बसणार आहेत. भद्रावती 54, वरोडा 65, चिमूर 76, ब्रम्हपुरी 68, नागभीड 41, सिंदेवाही 43, सावली 50, मूल 31, गोंडपिपरी 39, पोंभूर्णा 21, बल्लारपूर 10, राजुरा 27, कोरपना 17 तर जिवती तालुक्यातील एका ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.