खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:-
ब्रह्मपुरी शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पण ब्रह्मपुरी पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केल्याचे पाहण्यास मिळत आहे. गोपनीय माहिती वरुन कहाली गाव ते नानहोरी रोड वर काल रात्री वर नाकाबंदी लावली त्यावेळी एक मोटार कार नानहोरी गावाकडून कडून ब्रम्हपुरी कडे भरधाव वेगाने येताना दिसून आली.
तिला अडवण्याचा प्रयत्न करीत असताना चालकाने गाडी सोडून जंगलात अंधारात पळून गेला त्यांनंतर सदर गाडीची पाहणी केली असता सदर कार मध्ये देशी दारूच्या 20 पेट्या पेट्या देशी दारू 2,000 नग किंमत रु 2,00,000 व्यागनार कार क्र MH 04 AW 8067किमत रु 3,50,000 /- असा एकूण किंमत रु 5,50,000 /-आढळून आला.
कार, मुद्देमाल ताब्यात घेवून अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला .यावेळी पो ह खोब्रागडे, ना पो शी मुकेश, पो शी योगेश, अजय नागोसे यांनी सहकार्य केले पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.