ज्या अपघाताने वणी हादरली होती अखेर लागला निकाल.... केळापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी :- चार चिमुरडे मृत तर 5 विद्यार्थी झाले होते जखमी#wani - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ज्या अपघाताने वणी हादरली होती अखेर लागला निकाल.... केळापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी :- चार चिमुरडे मृत तर 5 विद्यार्थी झाले होते जखमी#wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी  :- सुरज चाटे


वणीत गेल्या चार वर्षा अगोदर मॅकरून शाळेच्या स्कुल बस व ट्रक मध्ये अपघात झाला होता, त्याने वणी चांगलीच हादरली होती दरम्यान त्याचा खटला केळापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. 


चार वर्षांपूर्वी घडलेल्या मॅक्रून स्कुलव्हॅन अपघात प्रकरणी, बुधवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी कोर्टाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. यात व्हॅन चालकास 5 वर्ष व स्कूलव्हॅनला धडक देणा-या ट्रक चालकाला 2 वर्षाच्या कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


सत्र न्यायालय केळापूर येथे आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. यात न्यायमूर्ती पी. बी. नाईकवाड यांनी हा निकाल दिला. या अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर 5 विद्यार्थी जखमी झाले होते. 

वणी तालुक्यातील, वणी शहरालगतच असलेल्या वडगाव रोडवर मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी शाळा आहे. दि. 18 फेब्रु. 2016 रोजी टाटा मॅजिक व्हॅन (MH 34- AA 7738) चा चालक गणेश बोधने, रा. वणी हा वणी शहरातून 9 विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी अं 7 वाजताच्या दरम्यान शाळेकरिता निघाला होता. 


नांदेपेरा रोड बायपास चौफुलीच्या काहीच अंतरावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळसा भरलेल्या एका ट्रकने स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात मॅकरून शाळेतील दोन विद्यार्थी गौरव हिरामण देऊळकर, व कु. श्रद्धा प्रदीप हुलके या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी कु. श्रेया रवींद्र उलमाले, आणि कु. दिशा राजू काकडे, यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 


या अपघातात कु. श्रुतिका संजय ढोके, हर्षद मनोज इंगोले, श्रेयस प्रदीप हुलके, कु. वैष्णवी भाऊराव मत्ते, निशांत यादव देऊळकर हे विद्यार्थी जखमी झाले होते. अपघातात व्हॅन चालक गणेश गुलाब बोधने हा सुद्दा जखमी झाला होता तत्कालीन ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांनी स्कूल व्हॅनला धडक देणारा ट्रक (MH34- M 1133) चा चालक नियाज अहेमद सिद्दीकी, घुग्गुस याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्द विविध कलमान्वये व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. 


घटनेच्या साडेचार वर्षानंतर पांढरकवडा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी स्कूलव्हॅन चालक आरोपी गणेश गुलाब बोढने, रा. वणी यास 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर वाहतूक नियम मोडून विरुद्द दिशेने वाहन चालवून स्कूल व्हॅनला धडक दिल्याचे दोषी ठरवून ट्रक चालक नियाज अहमद सिद्दीकी, रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर यास 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुुनावली आहे. 


🔰रस्त्याचे कंत्राट घेणाऱ्या खाजगी कंपन्यांनी सुद्धा जबाबदारी चोख बजावावि-

रस्त्याच्या विविध कामाचे कंत्राट घेणार हे सुध्दा बरेचदा पाहिजे त्या सुविधा देत नसतात त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात काही ठिकाणी घडत असतात त्यामुळे असे अपघात न व्हावे या दृष्टिकोनातून सदर कंपनीने सुद्धा नियमानुसार बोर्डस लावणे बंधनकारक असल्याचा सूर सुद्धा वणीकर जनतेतून दिसून आला व सदर न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.