अखेर 5 महिन्यानंतर कोडशी बु येथील रुग्णालय सुरू नागरिकांच्या मागणीला आरोग्य विभागाचा प्रतिसाद #korpna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर 5 महिन्यानंतर कोडशी बु येथील रुग्णालय सुरू नागरिकांच्या मागणीला आरोग्य विभागाचा प्रतिसाद #korpna

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


कोरपना तालुक्यातील कोडशी बु येथील आयुर्वेदिक रुग्णालय हे मागील गेल्या 5 महिन्यांपासून बंद अवस्थेत होते,सदर रुग्णालय हे तात्काळ सुरू करावे अशी मागणी युवा नेते आशिष ताजने,गावचे उपसरपंच बंडू वासेकर,विजय बोबडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली होती,सदर मागणीची दखल घेत आरोग्य विभागाने कोडशी बु येथील रुग्णालय हे नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केले आहे.त्यामुळे या गावातील परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असून सदर रुग्णालयात गट ब डॉक्टर यांची नियुक्ती केलेली आहे परंतु कोरोनाचे कारण सांगून येथील डॉक्टर यांची प्रतिनियुक्ती चंद्रपुरला कोरोना नियंत्रण विभागात करून येथील रुग्णालय बंद करण्यात आले होते परंतु सदर रुग्णालयात कोणत्याही अन्य डॉक्टरची नियुक्ती सदर जागेवर करण्यात आलेली नव्हती,त्यामुळे सदर रुग्णालय सद्यस्थितीत बंद अवस्थेत होते.त्यामुळे परिसरातील नागरिकांना व रुग्णांना सदर बाबीचा फटका बसत होता,तसेच परीसरातील नागरिकांना कोरपना येथे उपचारासाठी जावे लागत होते त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता तसेच कोडशी बु,गांधीनागर,तांबाडी,तुळशी येथील रुग्णांना सदर बाबीचा फटका सहन करावा लागत होतातसेच वारंवार रुग्णालय सुरू करण्याची मागणी करून सुद्धा आरोग्य विभागाचे सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष होते.त्यामुळे कोडशी बु येथील रुग्णालय हे बंद अवस्थेत होते ही बाब युवा नेते आशिष ताजने यांच्या निदर्शनास परिसरातील नागरिकांनी आणून दिली,त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत परिसरातील नागरिकांसह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांना निवेदन दिले व सदर रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.


तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे सुद्धा सदर प्रकरणाबाबत पाठपुरावा केला त्यामुळे आरोग्य विभागाने सदर मागणीची दखल घेत कोडशी बु येथील रुग्णालय सुरू केले.यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे व नागरिकांनी आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले आहे.