खबरकट्टा / चंद्रपूर :
कोरपना तालुक्यातील कोडशी बु येथील आयुर्वेदिक रुग्णालय हे मागील गेल्या 5 महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे,सदर रुग्णालय हे मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असून सदर रुग्णालयात गट ब डॉक्टर यांची नियुक्ती केलेली आहे परंतु कोरोनाचे कारण सांगून येथील डॉक्टर यांची प्रतिनियुक्ती चंद्रपुरला कोरोना नियंत्रण विभागात करून येथील रुग्णालय बंद करण्यात आले परंतु सदर रुग्णालयात कोणत्याही अन्य डॉक्टरची नियुक्ती सदर जागेवर करण्यात आलेली नाही,त्यामुळे सदर रुग्णालय सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांना क रुग्णांना सदर बाबीचा फटका बसत आहे,तसेच परीसरातील नागरिकांना कोरपना येथे उपचारासाठी जावे लागत आहे त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे तसेच कोडशी बु,गांधीनागर,तांबाडी,तुळशी येथील रुग्णांना सदर बाबीचा फटका सहन करावा लागत आहे तसेच वारंवार रुग्णालय सुरू करण्याची मागणी करून सुद्धा आरोग्य विभागाचे सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे.
त्यामुळे कोडशी बु येथील रुग्णालय हे बंद अवस्थेत आहे ही बाब भाजयुमो जिल्हा सचिव यांच्या निदर्शनास परिसरातील नागरिकांनी आणून दिली,त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत परिसरातील नागरिकांसह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांना निवेदन दिले व सदर रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी केलेली आहे.
यावेळी कोडशी बु येथील उपसरपंच बंडू वासेकर, सत्यवान चामाटे,तुळशी येथील विजय बोबडे, गणेश राजूरकर उपस्थित होते.