वणीतील प्रसिद्ध वकील जवळपास 40 वर्षाचा अनुभव असलेले अनंता दिगांबर देशपांडे यांचे यवतमाळ येथील रुग्णालयात शनिवारी पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे ते यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार घेत होते मृत्यूसमयी ते 75 वर्षाचे होते.
वणीतील वकिली क्षेत्रातील खांभिर नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित असणारे वकिली क्षेत्रात 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले तसेच शिक्षण प्रसारक मडंळ (एस.पि.एम, शाळा व लो. टी. महाविद्यालय) या संस्थेचे माजी अध्यक्ष, Advocate अनंतराव दिगांबर देशपांडे याना गेल्या चार दिवसा अगोदर कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान ते यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारा दरम्यान शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.