कोरोना चंद्रपूर 3903 : 262 नवे बाधित : एकाच मृत्यू : नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोविड सेंटर समोर गोंधळ #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना चंद्रपूर 3903 : 262 नवे बाधित : एकाच मृत्यू : नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोविड सेंटर समोर गोंधळ #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3903 झाली आहे. यापैकी 1850 बाधित बरे झाले आहेत तर 2007 जण उपचार घेत आहेत.


रविवारी एकूण 262 बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 38 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 1 बाधिताचा मृत्यू झाला आहे.तर मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोविड सेंटर समोर गोंधळ घातला. 


जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या नावाची दहशत प्रशासनातर्फे केली जात आहे असता थेट आरोप आज कोरोनाने मृत पावलेल्या नागरिकाच्या नातेवाईकांनी केली.


केळझर येथील आनंद विद्यालयाचे अध्यक्ष शिवराम शेंडे यांना 3 दिवस आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, 3 दिवस ते कोरोना निगेटिव्ह होते परंतु चौथ्या दिवशी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला व त्यांचा मृत्यू झाला.


आधी डॉक्टरांनी न्यूमोनिया झाला असल्याचे सांगितले व नंतर अचानक त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला कसा, यावर त्यांचे नातलग प्रचंड संतापले असता त्यांनी कोविड सेंटर समोर गोंधळ सुरू केला.


मृतदेह आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करू लागले सामान्य रुग्णालयात गोंधळ सुरू आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता तात्काळ कोविड सेंटरची परिस्थिती पोलिसांनी हाताळली.नातलगांचा आरोप आहे की प्रशासन हे कोरोनाच्या नावाने जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच काम करीत आहे.