वणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असून त्यामुळे शहरातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे आज सुद्धा तालुक्यातील 31 रुग्ण बाधित निघाल्याने आता पर्यंत 240 बाधित रुग्ण आढळून आले तर त्यापैकी 139 बरे झाले आहे तर ऍक्टिव्ह असलेल्या 99 रुग्णांवर उपचार सुरू आहे, अजून यवतमाळहुन 247 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
वणीत दिवसागणीक रुग्णांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कासव गतीने येणारी वाढ आता दुपटीने तिपटीने येण्यास सुरुवात झाली आहे. याला थांबविणे आवश्यक झाले आहे. शासनाने दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करण्याची गरज निर्माण झाली असली तरी, आज तब्बल आणखी 31 कोरोना बाधित आढळले.
यात भालर टाउनशिप येथील 13, कैलास नगर 3, मंदर 1, पळसोनी 1, मुरधोनी 1, निळापूर 1, राजूर 1, गोकुळनगर 1, रंगारीपुरा 1, बेलदारपूरा 1, आयडीबीआय बँक 1, गणेशपुर 1, कोलारपिंपरी 1, नायगाव 1, रवी नगर 1, पोलिस कोर्टर 1, विठ्ठलवाडी 1 आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
त्यातच सर्व शासकीय प्रशासकीय विभाग कर्तव्यदक्ष असून, प्रशासनातर्फे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मॅसेज व अफवा पसरवू नये, अनावश्यक गर्दी करू नये, शासनाने दिलेल्या गाईडलाईऩचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.