बेपत्ता : 3 महिने झाले तरी विवाहितेचा शोध लागला नाही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा बेपत्ता विवाहितेचा कुटुंबाचा ईशारा #rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बेपत्ता : 3 महिने झाले तरी विवाहितेचा शोध लागला नाही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा बेपत्ता विवाहितेचा कुटुंबाचा ईशारा #rajura

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा - 


राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील विवाहीत महिला तिन महिन्यापासुन बेपत्ता असुन राजुरा पोलीस स्टेशनला दि. 23 जून 2020 ला तक्रार दिली होती. तक्रार देऊन, सतत पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालयात चकरा मारुनही समाधानकारक व संशयीतांची चौकशी केली जात नाही आहे असा आरोप बेपत्ता विवाहिते चे वडील दादाजी टोंगे रा. केसुर्ली ता. वणी, जि.यवतमाळ यांनी केला आहे. 


जय भवानी कामगार सेना अध्यक्ष सुरज ठाकरे यांना सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा सुरज ठाकरे यांनी तात्काळ जय भवानी कामगार सेनेचे महेश हजारे यांना सांगीतले व पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांच्याशी भेटुन संशयीतांची चौकशी करावी अशी विनंती करण्यास सांगीतले. महेश हजारे यांनी पिढीत कुटुंबीयांना सोबत घेऊन सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेतली असता, कार्यात तत्परता दाखवत खैरे साहेबांनी राजुरा पोलीस स्टेशन येथून सदर प्रकरणाची माहिती घेतली व संशयीतांची चौकशी करा व बेपत्ता विवाहिताचा मोबाईल स्ट्रेस करुन शोध घ्या असे आदेश दिले. 
सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी तात्काळ दखल घेतली त्यामुळे विवाहीतांचे वडील यांनी समाधान व्यक्त करत पाणावलेल्या डोळ्यांनी आभार व्यक्त केले. 

यावेळी बेपत्ता मुलीचा शोध लवकर न घेतल्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बेपत्ता विवाहितेचा कुटुंबानी दिला.