चंद्रपूर जिल्हा परिषद 3 दिवस बंद : 4 ते 6 सप्टेंबर पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भावावर खबरदारीचा उपाय : नागरिकांनी कामकाजास्तव संबंधित विभागास ई-मेलद्वारे संपर्क साधावा #zp chandrapur closed for 3days - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा परिषद 3 दिवस बंद : 4 ते 6 सप्टेंबर पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भावावर खबरदारीचा उपाय : नागरिकांनी कामकाजास्तव संबंधित विभागास ई-मेलद्वारे संपर्क साधावा #zp chandrapur closed for 3days

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. अशातच जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्यालयातील तीन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहे. 
खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव इतर अन्य कर्मचाऱ्यांना होणार नाही. यासाठी जिल्हा परिषद मुख्यालय निर्जंतुकीकरण करण्याकरिता 4 ते 6 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. 
जिल्हा परिषद मुख्यालयातील कामकाज बंद राहणार असल्याने नागरिकांनी त्यांचे कामकाजास्तव संबंधित विभागास ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.