कोरोना चंद्रपूर 2945 : आज 182 नवे बाधित : 3मृत्यू #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना चंद्रपूर 2945 : आज 182 नवे बाधित : 3मृत्यू #covid-19

Share This
चंद्रपूर : खबरकट्टा -


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2945 झाली आहे. यापैकी 1381 बाधित बरे झाले आहेत तर 1532 जण उपचार घेत आहेत.


बुधवारी एकूण 182 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये रामनगर निवासी 82 वर्षीय नागरिक, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील 48 वर्षीय नागरिक व मूल रोड कबीर नगर परिसरातील 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 28 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.