चंद्रपूर कोरोना अपडेट : 290 नवे बाधित : 5 बाधितांचा मृत्यू : covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर कोरोना अपडेट : 290 नवे बाधित : 5 बाधितांचा मृत्यू : covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 



चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 5858 झाली आहे. यापैकी 3261 बाधित बरे झाले आहेत तर 2526 जण उपचार घेत आहेत.


रविवारी एकूण 290 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.


ज्यामध्ये शिवाजी नगर ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष, बामनवाडा राजुरा येथील 52 वर्षीय महिला, नगीनाबाग मधील 37 वर्षीय पुरुष, वणी यवतमाळ येथील 53 वर्षीय पुरुष व पाचवा मृत्यू बिकली नागभीड येथील 53 वर्षीय बाधितांचा मृत्यू झाला. 


सर्व मृतक बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 64 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.