चंद्रपूर ब्रेकिंग : अंदाजे 27 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त : मूर्तिकार झाले सुगंधित तंबाखू तस्कर : रामनगर पोलिसांची मोठी कार्यवाही : तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल जप्त #tobacco - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : अंदाजे 27 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त : मूर्तिकार झाले सुगंधित तंबाखू तस्कर : रामनगर पोलिसांची मोठी कार्यवाही : तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल जप्त #tobacco

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी लॉकडाउन च्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मध्यंतरी पोलिसांनी सुगंधित तंबाखू बनविणारी फॅक्टरीवर धाड मारली होती परंतु त्यानंतर सुद्धा सुगंधित तंबाखू हा सर्रास पणे विकल्या जात आहे.चंद्रपूर रामनगर गुन्हे शोध पथकाला गुप्त माहितीच्या आधारे शहरात सुगंधित तंबाखूचा साठा येत असल्याची पक्की माहिती मिळाली.त्याआधारे रामनगर पोलिसांनी बंदोबस्त करीत सापळा रचला व रात्रीच्या सुमारास नागपूर रोड वरून बंगाली कॅम्पच्या दिशेने जाणारे आयशर वाहन क्रमांक एमएच34 एव्ही 2433 येताना दिसले, मिळालेली माहितीच्या आधारे त्या वाहनातच सुगंधित तंबाखू असणार अशी खात्री पटल्यावर वाहन थांबविण्यात आले, त्या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये 25 नग साखरेच्या पिशव्या व 3600 नग मजा सुगंधित तंबाखूचे डब्बे किंमत 14 लाख 40 हजार, 160 नग ईगल कंपनीचे पाऊच किंमत 12 लाख व जप्त केलेले वाहन किंमत 13 लाख असा एकूण 39 लाख 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणात 2 आरोपीना अटक करण्यात आली आहे, 30 वर्षीय अपूर्व मुजुमदार, 20 वर्षीय सुकेश सरकार दोन्ही राहणार बंगाली कॅम्प यांचा समावेश आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी माहिती दिली की हा साठा कुठून आला व कुठे जात होता, याची माहिती काढण्यात येणार व संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली.या कार्यवाहीत अटक करण्यात आलेले दोन्ही युवक चंद्रपुरातील दुर्गा देवी मूर्तिकार असल्याचे कळते.